Thursday, 3 December 2015

महाराष्ट्र : पुरोगामित्वाची झूल पांघरणारा प्रतिगामी प्रदेश

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या जयंतीदिनी शनि शिंगणापूर येथे एक क्रांतिकारी घटना घडावी हा योगायोगच म्हणावा. महिलांना मज्जाव असणाऱ्या चौथऱ्यावर चढून एका स्त्रीने आपल्या महान रूढी परंपरांचा खून करत स्त्रियांना प्रवेश नसलेल्या भागात जाउन शनि देवाचे दर्शन घेतले म्हणजे फारच झाले. वर्षानुवर्ष फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी स्त्री प्रवेश करते हि घटना हा "पुरोगामी" महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हे शनि देवाचे दुधाने अभिषेक करून आपण दाखवून दिले. समाज निरक्षर राहिला तरी चालेल पण पूर्ण अंधश्रद्ध राहायला पाहिजे याची हा "पुरोगामी" महाराष्ट्र पूर्ण काळजी घेत आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या महान परंपरा आहेत आणि त्यांना छेद देण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि जे तसा प्रयत्न करतील त्यांना या जगातून रीतसर नाहीसे करण्यात येईल हा संदेश आपण अंधश्रद्ध निर्मुलन समितीचे प्रमुख श्री नरेंद्र दाभोळकर व सामाजिक कार्यकर्ते कॉ गोविंद पानसरे यांची हत्या घडवून आणून दिलाच आहे. हो आपणच त्यांची हत्या केली आहे, कारण एवढ होऊनही जर का आपण एक समाज म्हणुन या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध उभे राहणार नसू व जे होतंय ते मूकपणे बघणार असू तर मी म्हणेन कि त्यांच्या हत्येला आपणच सर्व जबाबदार आहोत. चुकीचे कायदे लादले म्हणून इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करणारे हेच भारतीय लोक, सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजा राम मोहन रॉय ना साथ देणारी हीच भारतीय मानसिकता, आज अचानक लोप पावली आहे. आज जो तो फक्त आपल्यापुरते पाहतो आहे. जे घडतंय त्याचा त्रास मला व माझ्या कुटुंबियांना होता कामा नये एवढी संकुचित जबाबदारी आपण बाळगतो आहोत.

एक समाज म्हणून आपण खूप दांभिक आहोत. एका बाजूला आपण शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कशी स्वताच्या आईची उपमा दिली यावर भरघोस चर्चा करतो, स्त्रीला देवीची उपमा देऊन, तिला आदिशक्तीचे रूप मानून तिची पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच स्त्रीला अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या आहारी जाऊन आपण कस्पटासमान वागणूक देतो. जी स्त्री हि जननी आहे, माता आहे, या सृष्टीच्या असण्यामध्ये जिचा बरोबरीचा किंवा जर जास्तच वाटा आहे तिला आपण सृष्टीकर्त्याच्या (?) दर्शनापासून वंचित ठेवतो. आणि याला आपण परंपरेचा बाळसेदार मुखवटा चढवतो. निसर्गनियमांमुळे स्त्रियांना ज्या गोष्टीला सामोरं जाव लागत त्यात तिचा काय दोष? आणि हा झगडा जर का देवाचा आणि स्त्रीचा असेल तर देवालाच निर्णय घेऊ देत कि. आपण का त्यात ढवळाढवळ करतोय. कि देव काही करू शकणार नाही व काही करत नाही यावर आपलाही ठाम विश्वास आहे कि काय? म्हणून आपण स्वतःच या सृष्टीचे नियम ठरवतो आणि ते सर्व समाजाला बंधनकारक करतो कि काय नकळे  

याच समाजाच्या अशाच विचारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करावासा वाटला, आणि एक खूप मोठा समुदाय हिंदू धर्मापासून वेगळा  झाला कायमकरता. आणि असाच विचार आजच्या सर्व महिलांच्या मनात आला तर ? काय गहजब उडेल विचार करा फक्त. कारण विचारांना  कृतीची जोड द्यायलाच हवी अशी काही या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची परंपरा नाही. पण एक नवीच परंपरा इथे जन्म घेताना दिसत आहे आजकाल. ज्यांचे विचार पटणार नाहीत किंवा ज्यांच्या विचारांनी समाज जागृत होणार असेल अश्या सामाजिक भान असलेल्या विभूतीना या जगातून तत्परतेने नाहीसे करायचे, हि ती परंपरा. आणि हे कृत्य करणाऱ्या महान क्रांतीकारकांना हे पूर्ण ज्ञात आहे कि हा महाराष्ट्र आता कधीही पेटून न उठणाऱ्या विझलेल्या ज्वालामुखीसारखा आहे. तुम्ही कितीही घाव घाला येथे परत काही असंतोषाचे जनक निर्माण होणार नाहीत, कि सुधारक जन्म घेणार नाहीत. सेनापती बापट आज हयात असते तर म्हणाले असते कि भारत एक देश म्हणून भले प्रगती करत असेल पण यात महाराष्ट्र कुठे दिसत नाही. (दिसत नाही म्हणजे नैतिकता कुठे दिसत नाही). पुढे जाऊन अस म्हणावसं वाटत कि आज जर ज्योतिबा असते तर या महाभागांनी त्यांचाही खून केला असता आणि आपण तेव्हाही असेच बघत बसलो असतो जसे आज बघत बसलो आहोत.

दिनांक : ०२ डिसेंबर २०१५

एक जाणीव शेअर करतो. झालंय काय कि, टी पी  सुरु झाल्यापासून, तो मिनी ट्रक मीच चालवतोय. आणि आता माझा त्याचावर पूर्ण कंट्रोल आलाय अस मला वाटतंय. आणि तसा आता वेळ कमी मिळतो, मग कुठेही येणजाण पण कमी झालं, त्यामुळे कार चालवण्याचे प्रसंग कमीच येतात. काल अचानक दुपारी एक काम होत म्हणून मी श्री ला म्हंटल कि आज तू माझी कार घेऊन ये. पण नंतर कार चालवताना असा जाणवल कि थोडी गडबड होत्ये चालवताना. काहीतरी चुकतंय. प्रत्येक वाहनचालकाचा आपल्या वाहनावर हात बसलेला असतो. पहिला गिअर टाकल्यापासूनच ते लगेच लक्षात येत. पण गेल्या दीड महिन्यात माझे माझ्या कारकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. ट्रक वर ताबा मिळवताना मी कारचा कंट्रोल सोडत होतो हे लक्षातच नाही आल, कारण दोन्ही गाड्या चालवण्याच टेक्निक थोडं वेगळ आहे. त्यामुळे असाव पण मला कार चालवताना जरा सांभाळून चालवावी लागत होती. ज्या माझ्या कारने मला ड्रायविंगचा मजा दिला, जिला मी मला हवी तशी चालवू शकत होतो, आज मला तिची ओळख थोडी पुसली गेल्यामुळे सांभाळून चालवावे लागत होते. म्हंटल तर दुर्लक्ष करण्यासारखा प्रसंग, पण विचार केला तर खूप काही शिकवून जाणारा. 

जर निर्जीव कारकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रसंग येत असेल, तर काही जिवलग नात्यांकडे नकळत दुर्लक्ष झाले तर काय होईल, असा विचार मनात आला आणि हादरून गेलो. आत्ताआत्तापर्यंत जे मित्र किंवा नातेवाईक आपल्या खूप जवळ होते, ज्यांच्यावाचून आपल्याला करमत नसे, दिवसभरात एकदातरी ज्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसे, अश्या व्यक्तींकडे जर नकळत का होईना आपल्याकडून दुर्लक्ष होत असेल, तर त्यांना काय वाटत असेल. समजून घेतलं तर ठीक, पण नाही समजून घेतलं तर. घरात म्हातारे आई वडील असतात, आज त्यांच्यामुळेच आपण इथवरचा प्रवास केलेला असतो, मुल असतात म्हणजे पुढची पिढी, या सर्वाना वाटत असत कि रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ तरी आम्हाला द्यावा. अगदी तासंतास गप्पा नाही मारल्या तरी निदान चौकशी करावी बास, एवढीच माफक अपेक्षा असते बऱ्याचदा या सर्वांची. पण आपण आपल्यातच इतके गुंग असतो कि या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. नाती टिकवायला संवाद जरुरीचा असतो हा मुख्य नियमच आपण विसरून जातो. आणि जेव्हा लक्षात येत ना तेव्हा थोडा उशीर झालेला असतो. नाती तुटत नाहीत, पण त्यातला ओलावा नष्ट झालेला असतो. 

मान्य आहे कि आजचे आयुष्य खूप धकाधकीचे आणि आव्हानांचे आहे. माणूस स्वतःबरोबरच वेळेशीही झुंज खेळतोय. कितीही मनात आल तरी कित्येकदा प्रत्यक्ष भेट घेण नाही शक्य होत. पण हि धकाधकी तर आता जीवनाचा मुख्य भाग आहे आपल्या, तिच्यापासून तर दूर पळता येणारच नाही. पण ते करताना जर आपण आपले आईवडील, पत्नी, मुल, मित्र व इतर आप्त यांच्यासाठी अधूनमधून थोडा वेळ काढला तर काय बहार येईल बघा. सगळाच समतोल साधला जाईल. या सर्वांशी बोलल्याने तुम्हालाही थोडा विरंगुळा वाटेल आणि त्यानाही थोडं बर वाटेल कि बघा एवढ्या व्यापातून पण हा आमच्यासाठी थोडा का होईना पण वेळ काढतोच. संवाद खूप महत्वाचा भाग आहे मानवी जीवनातला. संवाद नसेल तर नाती तुटायला वेळ लागत नाही, मग ती कितीही जवळची का असेना. 

सांगायचा मुद्दा हा कि, माझा माझ्या कारशी संवाद कमी झाला होता, तर ते निर्जीव यंत्र पण साथ देईना  झालं, मग भावभावनांचा कल्लोळ असलेल्या मनांच काय होत असेल. आता ठरवलंय कि कितीही बिझी असलो तरी योग्य तितका वेळ सर्वांनाच द्यायचा, मग ती कार का असेना …. 

Sunday, 22 November 2015

मुंबई पुणे मुंबई २ :

दिग्दर्शक सतीश राजवाडे. एक नावाजलेलं नाव. दूरदर्शनवरच्या काही नामांकित मालिका लिहिणारा, कसदार अभिनय करणारा आणि दिग्दर्शन करणार नामवंत व्यक्तिमत्व. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशस्वी प्रदर्शनानंतर आणि मिळालेल्या घवघवीत यशाने अपेक्षा वाढवणार नाव. पण दुसऱ्या भागात पूर्ण अपेक्षाभंग करणार पण हेच नाव. कोणी म्हणेल कि हा ईसम चित्रपटाबद्दल लिहायचं सोडून दिग्दर्शकाच्या मागे का लागलाय. कारण माझ्यामते जसे एखाद्या चित्रकाराला चित्र काढायच्या आधीच ते चित्र डोळ्यांसमोर दिसत असते, तसेच लेखकाला व दिग्दर्शकालापण आपली कलाकृती जाणवत असते, जाणवली पाहिजे. ती जर का नसेल जाणवत तर राजवाडे आणि इतरांमध्ये मग काय फरक.

या चित्रपटाची एकच जमेची बाजू म्हणजे, स्वप्नील जोशीचा अभिनय. पहिल्या भागातही त्याने उत्तम अभिनय केलाच होता, परंतु या भागात त्याने मुक्ता बर्वे सारख्या कसदार अभिनेत्रीला निष्प्रभ करण्याइतपत जबदरस्त अभिनय केलाय अस म्हणायला नक्कीच वाव आहे. मी काही स्वप्नील जोशीचा चाहता वगैरे नाही. खरतर, मला मुक्ताचा अभिनय आणि तिचा वावर खूप आवडतो. पण का कुणाश ठाऊक पण पहिल्या भागात सराईत अभिनय करणारी मुक्ता या भागात कुठे दिसलीच नाही.

चित्रपटाच कथानकही फारच बाष्कळ गोष्टीवर रेंगाळत ठेवल्यासारख वाटत. लग्नासारखा महत्वाचा निर्णय, लग्न दोन दिवसांवर आल तरी मुलगी घेत नाही आणि मुलगा पण तोवर तिची वाट बघतो हे मनाला अजिबात पटत नाही. अगदी दिग्दर्शक राजवाडे असले तरी.

चुकीच्या निर्णयावर किवा निर्णय न घेतलेल्या निर्णयावर आपण म्हणु, मुलीला सावरून घेणाऱ्या आणि तिला एकट पडू न देणाऱ्या बापाच्या भूमिकेला मात्र सलाम. कित्येकदा आपले निर्णय चुकतात, पण कोणी पाठीराखा मिळत नाही मग आपण एकतर कोसळतो किंवा मग कधी कुठले निर्णय एकहाती घेत नाही. लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करतो. पण इथे तिच्या अवघडल्या अवस्थेत तिच्या वडिलांनी साथ दिलेली दाखवून दिग्दर्शक राजवाडेनि थोडी भरपाई केली आहे.

बाकी सर्वांचे अभिनय ठीकठाक.

कशासाठी बघावा हा चित्रपट : समजूतदार वडिलांसाठी आणि स्वप्नील जोशीच्या अभिनयासाठी
का बघू नये : न पटणार कथानक

मी हा चित्रपट पुन्हा बघणार नाही, अगदी मराठीचा अभिमान असला तरीही.

Thursday, 29 October 2015

दुभंगलेली नाती :

वस्तू जुन्या झाल्या किंवा नकोश्या झाल्या, कि आपल्याला ती अडगळ वाटायला लागते, मग आपण घर सफाईच्या नावाखाली अश्या वस्तुंना बाहेरचा रस्ता दाखवतो. प्रेमाचं पण तसच काहीसं आहे. एकेकाळी जीवापाड जपलेल नात, काळाच्या ओघात नष्ट होत. ज्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय दिवस सुरु झाला असे वाटत नसे, आपली सर्व सुख दुख जीला सांगितल्याशिवाय आपल्याला करमत नसे, तिच्या सुख दुख्खात पण आपण तेवढ्याच तन्मयतेने समरस होत असु, अशी नातीही कधी कधी जड वाटायला लागतात, मग एकमेकांच्या वागणुकीत दोष आढळायला लागतात. त्याची कारणे काहीही असू शकतात. पण परिणाम एकच असतो. मग आपण अश्या जड नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारण शोधायला लागतो. नात जोडायला खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु ती तोडण्यासाठी अगदी फुटकळ कारणही पुरतात. उदाहरणादाखल "तुझ माझ्याकडे लक्षच नाही" किंवा अगदी याच्या उलट म्हणजे "तू माझ्यावर फारच देखरेख करतोयस / करत्येस", "किती प्रश्न विचारतोस / विचारतेस? घुसमट होत्ये अगदी", "मी का म्हणून तुझं ऐकायचं, मला माझे निर्णय घेता येतात" इत्यादी. खर म्हणजे या वाक्यांना किंवा नंतर कशालाही काही अर्थ नसतो. ते नात जपण्यासाठी घेतलेले कष्ट विसरून आपण त्यांतून बाहेर पडण्यासाठी त्यात अनेकानेक दोष शोधायला लागतो. आणि मग त्यातूनच विसंवाद वाढीस लागतो. विसंवादातून दुरावा वाढायला लागतो, आणि नात्यातील ओढ नष्ट होते. मग होतो एका चांगल्या नात्याचा अंत. यात दोष कोणाचाच नसतो. असेल, तर तो फक्त काळाचा दोष असतो. नाती जोडताना आपण बऱ्याचदा त्याची भव्यता पाहतो, त्यातील खाचखळगे कालांतराने नजरेस पडतात. सोडायचहि असत आणि तोडायचही नसत, मग होते मानसिक ओढाताण. त्यातूनच शाब्दिक खटके उडायला लागतात, एकमेकांवर असले - नसलेले दोषारोप केले जातात. आणि या सगळ्याच पर्यवसान एका सुखसंवादाच्या नात्याचा अंत होण्याने होतो. हे अस होणं गरजेच होत का? याला दुसरा काही पर्याय नव्हता का? न तोडता एका समान पातळीवर हे नात जपता नसत आल का? हे प्रश्न पुन्हा उभेच राहतात अनुत्तरीत. कारण आपण बरेच निर्णय भावनेच्या आधारे घेत असतो. आणि जीथे भावनाच उरत नाही, तिथे या प्रश्नांनाही काही अर्थ उरत नाही. बघा जमल तर, नात्यात दुरावा येईल इतका विसंवाद होऊ देऊ नका. खूप दुर्मिळ झालीयेत नाती आजच्या व्यावहारिक जगात. दुखावलेल मन सावरायला खूप काळ जावा लागतो आणि जरी काळ गेला तरी जखम भरून येईल आणि दुभंगलेली नाती पुन्हा पूर्ववत होतील याची काही शाश्वती नाही 

Tuesday, 20 October 2015



तेरा तसव्वुर :

बरंसोसे छिपे हैं कुछ ख्वाब सिने मे,

तेरे आनेसे उन्हे थी जंमी मिल गयी,

तुझे देखा पहली बार और समझ आयी ये बात,

मेरी शायरीमे क्या थी कमी रह गयी,

यु तो बाते बनाना कोई बडी बात नही मेरे लिये,

पर तेरे आनेसे जुबां थमी रह गयी,

खामोश लफ़्जोको कैसे समझाऊ ये बात,

क्या मुहोब्बतमे मेरे कमी रह गयी,

ना मिलते हो तुम, ना तुम्हारा तसव्वुर कही,

अब जीनेकेलीये तुम्हारी यादें

और उन यादोमे बस तुम्ही रह गयी …. 

Wednesday, 7 October 2015


ऐसे मोड से गुजर रही है जिंदगी,

के तेरी बात नही तो कुछ नही,

तेरी याद नही तो कुछ नही,

जिने के लिये तो बस,

अब तेरा साथ नही तो कुछ नही ….

 


तेरे खफा होने की वजह पता चलती फराज,

तो मैं भी रुठनेका बहाना ढुंढ पाता  ….

Monday, 5 October 2015




वक़्त बहुत कम था,
वरना तुझसे भी दोस्ती कर लेते ए जिंदगी,
मौतसे पुराना रिश्ता है, निभाना हि था,
वरना उसे भी जिना सीखा देते ए जिंदगी …. 





तुझसे बिछडनेके बाद,
ख्वाहीशसी रह गयी है जिंदगी मेरे लीये,
अब मौतही बन गयी है जिंदगी मेरे लीये,
तुझसे बिछडनेके बाद …. 


मनस्वी पाऊस  :

पाऊस आला आणि गेला,
पण नीट बरसलाच नाही,
धरती तहानलेलीच राहिली,
पाऊस मात्र यावेळी परतलाच नाही.

कुठे चुकल गणित कळलंच नाही,
अंदाज केलेल्यांना पाऊस नीट समजलाच नाही,
धरती मात्र लोकानुनय करीत राहिली,
पण पाऊस मात्र यावेळी परतलाच नाही.

प्रेमधारा बरसवायला पाऊस आतुर असतो,
जलधारांनी ओथम्बलेला प्रेमातुर  दिसतो,
पण यावेळी त्याने प्रेमगीत गायलेच नाही
एकदा जो गेला तो पुनः परतलाच नाही.

काय करावे आता धरतीला कळेना झाले,
कसे आणावे पावसाला तिला उमजेना झाले,
तिची तगमग बघून पावसालाहि राहवले नाही,
निरोप धाडला त्याने,
पुढच्यावेळेस आलो कि बरसल्याशिवाय जाणार नाही.
ओथम्बलेल्या धारांनी चिंब केल्याशिवाय जाणार नाही.

Sunday, 4 October 2015



तुझ्या भुरभुरणाऱ्या केसांची
आठवण आहे मला,
म्हणून तर जगण्यामध्ये,
अजुनही रस आहे मला …. (१)


तुझ नसेल प्रेम माझ्यावर,
पण बोलू तरी नकोस,
माझा जगण्याचा आधार आहेस तु,
तो असा मोडु तरी नकोस …. (२)


माझ्या मनात काय आहे,
तुला कधी कळेल का,
शब्दही आटले माझे आता,
पण तुला कधी ते समजेल का …. (३)


इसे तुम प्यार समझो या मेरी कमजोरी फराज,

अब नींद भी जागती है तो बस तुम्हे सोचते …. (१)



तुम कहते हो, तुम्हे प्यार नही मुझसे फराज,

शिकायत तब होती, अगर ऐतबार न होता मुझसे  …. (२)



तुमसे प्यार का इक्बाल ए जुर्म कर दिया हमने फराज, 

अब सजा दो या वफा, तुम्हारी मर्जी …. (३)



दो बुंद क्या निकले उसकी आंखोंसे फराज,

यहां तो बारीशोके जमाने आ गये …. (४)

पाऊस आणि तु  :

हा पाऊस जेव्हा जेव्हा येतो, तुझी आठवण घेऊन येतो,

तुझी सय आली कि, डोळ्यात पाणी होऊन येतो,

पाऊस पण तुझ्यासारखाच थोडा लहरी आहे,

येतो तर सोसाट्याच्या वाऱ्यासारखा, 

उचंबळून प्रेम करणाऱ्या प्रेयसिसारखा,

नाहीतर दडतो ढगांच्या पडद्याआड,

खोडी काढून लपलेल्या मुलासारखा,

माझ्या अंतरंगात भरला आहे हा पाऊस आणि,

रोमरोमात दाटल्या आहेत तुझ्या आठवणी,

तुझ्या हरवलेल्या आठवणी, आठवून देणारा हा पाऊस,

तुझ्या केसांच्या बटांसारखा, भुरभुरणारा पाऊस,

तुझ्या पाणीदार डोळ्यांतील चमक घेऊन,

विजेशी लपंडाव करणारा पाऊस,

तुझे खळाळते हास्य होऊन, सभोवार कोसळणारा पाऊस,

तुझ्या निरामय सौन्दर्यासारखा, निसर्ग खुलवत येणारा पाऊस,

तुझ्या शब्दांच्या फणकाऱ्यासारखा, ढगांचे काळीज चिरत येणारा पाऊस,

तु नसताना, गुपचूप ठिबकून जाणारा पाऊस,

तु रागावलीस कि, दूर जाऊन बरसणारा पाऊस,

तु बरोबर असलीस कि, ओलेचिंब करून जाणारा पाऊस,

कस वेगळं करू तुला आणि या पावसाला,

तुम्हीच तर रंग भरलेत माझ्या जगण्याला,

जेव्हा जेव्हा हा पाऊस तुझी आठवण घेऊन येतो,

आणि तुझी सय आली कि, डोळ्यात पाणी होऊन येतो. 

Friday, 2 October 2015



तेरी खामोशी  :

जीस दिन कोई बात नही होती तुमसे,

बडी देरसे गुजरता है दिन,

खामोष रुके हुए पानी कि तरह,

बेजानसा गुजरता है दिन,

एक गुजारीश है तुमसे मेरी,

जानते हो तुम, बेबाकसी है जिंदगी मेरी,

कुछ नासाज हरकत हो मुझसे,

रुठना ना तुम,

टूट जाऊंगा अगर युं खामोश रहोगे तुम,

मेरे जीने के लीये तेरा एकही लब्ज काफी है,

जो तुम पुछो "बता यार तेरे मिजाज कैसे हैं"

Tuesday, 15 September 2015

कविता : तुला पाहिले मी नदीच्या किनारी

कवी : ग्रेस


खूप छान कविता. ग्रेसच्या काव्याप्रतीभेबद्दल आपण कोण बोलणार. पण राहवत नाही, वेगवेगळ्या उपमा देऊन

प्रेमाविष्कार साकार करण्याची त्यांची हातोटी काही औरच. हि कविता पण त्याच धरतीची. काही जुजबी 

अहंकाराने ग्रासून (स्वतःला खूप कळतंय अशा अर्थी) केलेला हा भावानुवाद :


तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुझे केस पाठीवरी मोकळे

इथे दाट छायांतुनी रंग गळतात

या वृक्षमाळेतले सावळे ! (१)


कवीला अचानक ती नदीच्या किनारी उभी असलेली दिसली. नुकतीच नदीच्या पाण्याने सुस्नात झाल्याने तिने 

केस पाठीवर अशा तऱ्हेने मोकळे सोडले आहेत कि जसे दाट वृक्षराजीतून चंद्राची किरणे जशी जमिनीवर 

सांडतात, तसे तिच्या दाट काळ्या केसातून सावळा रंगच गळतोय असा भास होतोय कवीला … खूप छान 

कल्पना


तुझी पावले गे धुक्याच्या महालात

ना वाजली ना कधी नादली

निळागर्द भासे नभाचा किनारा

न माझी मला अन्‌ तुला सावली (२)


इतक्या अलगद पडतायेत तिची पावले कि क्षणभर वाटाव कि धुक्यावर चालत असावी, काही आवाज नाही, 

अगदी अलवार, कापसावर वां ढगावर पाउल ठेवले  तर जसा त्याचा काहीच आवाज नाही होणार, आणि आवाज 

नाही तर नादही नाही, अशी तिची मोहक चाल आहे. त्यात आभाळाचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात अशा प्रकारे

पडले आहे जणू आभाळ आणि नदी एकरूप झाले आहेत. कवी आणि त्याची प्रेयसी यांची मने पण इतकी 

एकरूप झाली आहेत कि त्यांचे वेगळे अस्तित्वच जाणवत नाही आहे, वेगवेगळ्या सावल्यांप्रमाणे ….


मनावेगळी लाट व्यापे मनाला

जसा डोंगरी चंद्र हा मावळे

पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते?

जसे संचिताचे ऋतु कोवळे (३)


तिला पाहिल्यापासून कवीचे चित्त थाऱ्यावर नाही आहे. तिने त्याचे मन व्यापून टाकलंय त्याच्या मनाविरुद्ध. 

असे एखाद्या स्त्रीकडे पाहणे खरेतर त्याला मान्य नाही, पण तिचे अस्तित्व त्याच्या मनांत घर करून राहिले 

आहे आणि म्हणून कवी तिचा पाठलाग करतोय. तिचे सावळे सौंदर्य अधिकाधिक मनांत साठवण्यासाठी. मधेच

ती कवीच्या नजरेआड जाते आहे, जसा मावळतीचा चंद्र कवीमनाला हुरहूर लावून जातो, तसेच तिचे अचानक

नजरेआड जाणे त्याला हुरहूर लावत्ये. मधेच ती उभी राहत्ये काही विचार करत, तिचा चेहेरा पण दुख्खी 

दिसतोय, कळत नाही आहे कसल्या वेदनेने तिला ग्रासले आहे. सर्व ऋतूंचे एकत्रित तेज तिच्या कोवळ्या 

चेहेऱ्यावर पडल्यासारखे भासते आहे, ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत्ये.


अशी ओल जातां तुझ्या स्पंदनातून

आकांत माझ्या उरीं केवढा

तमांतूनही मंद तार्‍याप्रमाणे

दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा (४)


कवी खूपच भावनाशील झालाय तिच्या चेहेऱ्यावरच्या दुखः पाहून. दुखः जरी तिला होत असले तरी त्यांची

वेदना मात्र कवीच्या मनाला होत आहे. तिच्या वेदनांचे काहूर कवीच्या मनांत उठले आहे. पण त्यातही कवीची 

काव्यप्रतिभा त्याला स्वस्थ बसू देत नाही. तिच्या हातातल्या बांगड्या कवीला अंधारात पण प्रकाश देणाऱ्या 

ताऱ्याप्रमाणे भासत आहेत.





Sunday, 13 September 2015

काफिर मेरे मरनेका तुम इंतजार ना करो,

मैं तो युंही मर जाऊंगा, तुम अगर मुझसे बात ना करो. 

Saturday, 12 September 2015

ये किस  बातकी सजा मुझे तुम दे रहे हो क्या पता,
मैं जिंदा हुं, पर मेरी सांसें कहाँ हैं क्या पता,
बस एक बार दिदार करादे मेरे यार,
फिर हम मिलें ना मिलें इस जनममें क्या पता ।

Thursday, 10 September 2015


भेट तुझी  :

काय सांगु तुला, तू भेटल्याशिवाय करमत नाही,

पण तू भेटून गेलीस, कि मग जीव कशातच रमत नाही.

खूप काम करायची असतात, पण एकही करायला जमत नाही,

खर सांगतो, तू भेटून गेलीस किजीव कशातच रमत नाही.

तुझ्याच विचारांचा फक्त विचार करतो, इतर विचार मनात येतच नाहीत,

आई शप्पथ, तू भेटून गेलीस कि जीव कशातच रमत नाही.

स्वस्थ पडून राहावं म्हणून डोळे बंद केले,

तर काय करू तुझी प्रतिमा डोळ्यापुढून हटत नाही,

आणि भेटून तू गेलीस कि जीव कशातच रमत नाही.

एक काम करशील माझ्यासाठी?

जाताना स्वतःलाही  नेत जा बरोबर,

तू जातेस पण राहतेस आठवणींचा हिंदोळा मागे सोडून,

तो हिंदोळा थांबवणं मला तरी जमत नाही,

आणि काय सांगू तुला मी,

तू भेटून गेलीस कि जीव कशातच रमत नाही,

तू भेटून गेलीस कि जीव कशातच रमत नाही

Sunday, 30 August 2015

सिग्नल यंत्रणेची गरज कोणाला :

त्यादिवशीही नेहमीप्रमाणे सी एस टी स्थानकात उतरलो आणी कफ परेड करिता असलेल्या टेक्सीच्या रांगेत उभा राहिलो. यथावकाश टेक्सी मिळाली आणी वाहनांच्या गर्दीत घुसली. वाहनचालक एक तिशीचा युवक होता. त्यामुळे वयाचा असलेला जोष वा दोष त्याच्यात पुरेपूर होता. मन मानेल तशी आणि बेदरकारपणे तो वाहन हाकत होता. तो ज्याप्रकारे चालवत होता त्याला हाकणे हाच शब्दप्रयोग योग्य आहे. एक दोन वेळा मी त्याला सांगूनहि पाहिले कि बाबा आम्हाला कोणालाही घाई नाही, सावकाश चालवलस तरी चालेल. पण त्याने काही ते मनावर घेतलं नाही व तो आपल्याच धुंदकीत गाडी चालवत होता. मधे येणाऱ्या वाहनांना शिव्या देत आणि मग त्यांना पुढे जाऊन उगाच कट मारत आणि तोंडात अखंडपणे पानाचे चर्वण करत आमची वाहनयात्रा चालू होती. 
ताज विवांता होटेल जवळ त्याने सिग्नल तोडला. मग मात्र मला अजीबात राहवले नाही. मी म्हंटले "अरे यार सिग्नल का तोडला? दुसरे कुठले वाहन धडकून अपघात झाला असता मग?" त्यावर त्याचे उत्तर आले "साहेब या सिग्नलला कधीच पोलिस उभा नसतो". दोन मिनिट मला कळलेच नाही कि याला म्हणायचे काय आहे. सिग्नल रस्त्यावरच्या वाहनांसाठी आहे कि पोलिसांसाठी? माझी मतीच कुंठीत झाली. त्याचे अजून काही बौद्धिक घेऊ म्हंटले तर तो ऐकून घेणारा वाटला नाही आणि माझे उतरायचे ठिकाणही तोवर आले. 

पण त्याचा युक्तिवाद विचार करायला भाग पाडून गेला. कि, खरच या सिग्नल यंत्रणेची खरी गरज कोणाला? वाहतूक सुरळीत चालु  रहावी म्हणुन वाहनांना कि सिग्नल तोडला कि चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांना? आपणही बऱ्याचदा हेच करत असतो. अगदी सकाळी किंवा अगदी रात्री पोलिस जर जागेवर नसेल तर आपल्यापैकी बरेच लोक सरळ सिग्नल तोडून पुढे निघून जातात. एखादा रस्ता सुद्धा "नो एन्ट्री" केलेला असेल तर पोलिसांची ड्यूटी संपली कि बिनधास्तपणे त्या रस्त्यावर गाडी घालताना आपण काही चूक करीत आहोत, असे आपल्या मनालाही शिवत नाही. परदेशातली वाहन शिस्तीची कायम उदाहरणे देणाऱ्या आपणाला इथली वाहतूक नियामकता न पाळण्यात काय आनंद मिळतो कोण जाणे. एकाने सिग्नल तोडला कि, कसायाकडे जाणाऱ्या बकऱ्याप्रमाणे इतर वाहनेही त्याच्या मागोमाग वाहने घालतात आणी पूर्ण वाहतूक यंत्रणेची ऐशीतैशी करून टाकतात. आणी मग पुर्ण फियास्को झाला कि कुठून तरी एक पोलिस उगवतो आणी मग तो त्याच्या भाषेत सर्वांचा उद्द्धार करून वाहतुक नियमित करण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य आपल्या सर्वांच्याच इतके अंगवळणी पडले आहे कि हे असेच चालायचे हे आपण गृहीत धरतो आणी वाहतूक सुरळीत व्हायची वाट पाहतो. 









किनारे :

कधी म्हंटल तुला तु माझ्यात एकरूप हो म्हणुन,

शक्य नाही ते, मी ही जाणतो.

दोन किनारे आहेत, आपली आयुष्य म्हणजे,

कधीही न जुळणारे.

कितीही ओढ असली तरी, एक होऊ न शकणारे,

किनाऱ्याना पण त्यांची मर्यादा ठाऊक असते,

मलाही ठाऊक आहे ती आणि तुलाही.

ते मनांत आलं म्हणुन, जागा सोडु नाही शकत,

पण लक्ष ठेऊन असतात दुरूनच एकमेकांवर,

निरोपही धाडतात कधी, भरती ओहोटीच्या लाटांवर.

भेटत नाहीत म्हणून, ओढ जरी त्यांच्यातली संपत नाही,

परंतु न भेटण्याचं सल, मनातुन मात्र जात नाही.

त्या किनाऱ्यावर तुझी वाट पाहतोय मी,

तु येशील कधीतरी, या खोट्या आशेवर जगतोय मी,

तु येशील कधीतरी, या खोट्या आशेवर जगतोय मी.






Tuesday, 18 August 2015



कुछ मेरी कहानी तेरी थी, कुछ तेरी कहानी मेरी,
कहानिसेभी कभी बढकर थी दोस्त, ये तेरी मेरी यारी. 

कुछ मेरे फसाने तेरे थे, कुछ तेरे फसाने मेरे,
युहि फसाने बनते दोस्त, अगर तु होता साथ मेरे. 

कुछ मुझसे शिकायत थी तुझे, कुछ तुझसे गिला मुझे,
दो पल की मोहलत देते दोस्त, ना अफसोस रहता तुझे. 

अब हो गये रस्ते जुदा अपने, किस्मत कि है बात,
पर तु रहेगा हमेशा मेरे दिलमे, हो ना हो तेरा साथ

Thursday, 6 August 2015


हवाहवासा राग तुझा :

रागावलीस कि तु काही वेगळीच भासतेस,
चेहेऱ्यावरती राग दाखवुन, मनोमन मात्र हसतेस,
संध्याकाळचा रक्तीमा तुझ्या गालावर उतरतो,
नाकाचा शेंडा लाल होतो, हातांचा चाळा पण वाढतो,
बघत बसावं तुझ्याकडे असा तो नजारा असतो,
आणि, यासाठीच तुला मी वारंवार चिडवतो,
काय तुझं रागावणं तरी, एक दिवसही टिकत नाही,
तुझ्या स्वभावामधे कायमचा राग, बसतच नाही. 
पण तो तेवढ्या वेळेचा अबोला, ब्रम्हांड आठवुन देतो,
संपलं आता सार, अस मग सतत वाटत राहत.
खर सांगतो, तु पुनः बोलेपर्यंत, माझ्या जीवात जीव नसतो,
त्यावेळी मात्र आठवणीने मी, देवाचा धावा करतो. 
तु पुनः बोलायला लागलीस की, देवावरचा विश्वास वाढीस लागतो,
तुला चिडवण्यासाठी मग मी पुनः, नव्या जोमाने कामाला लागतो ....

Thursday, 30 July 2015



अपनेआपसे भागता रहा मैं जिंदगीभर,
तुम्हारे आनेसे रस्ते, मंजिल बन गये,
जिना जैसे नफरतसा बन गया था मेरे लिये,
तेरे आनेसे जीनेके बहाने मील गये ……


जमानेको तो तेरे नाम से भी नफरत है फराज,
और मुझे जमानेकी नफ़रतसे मुहोब्बत ….


इंकार कि कोई वजह तो होगी फराज,
या बस मेरा नाम हि काफी है ……

Tuesday, 28 July 2015



सपनो को हकीकत बना सकता हुं मै फराज,
पर हकीकत ये है, मै अब सपने नही देखता ….


हमे भुलाना इतना आसां ना होगा फराज,
कई राते गुजारी है, तुम्हारी याद मे हमने भी ….


प्यार भी करते हो, और लोगोका डर भी है,
मिट्टीका घर बनाना है, और हाथमे किचडभी ना लगे  …. 


उनपे शायरी करना बडा आसां है फराज,
खुबसुरतीका वोह आलम है, कि हर लब्ज शायरी है …. 


ना भी ना करना और हां से दुर भागना, ये कब तक चलेगा फराज,
देखना, ये कही तुम्हारी फ़ितरत ना बन जाये … 


बिखरना मेरी फितरत ही सही,
पर तुझेभी संवारना तो आया नही,
जूबां खामोष थी, और तेरी कमी मेहेसुस हो रही थी दोस्त,
पर मेरे दिलको पढना तुझे कभी आयाही नहीं …. 


टुटति हुई जिंदगीको देखा है मैने,
हर पल ख्वाबोन्को मरते देखा है मैने,
तु कहता है, ये चंद लम्हे हैं, गुजर जाएंगे,
पर कुछ अपनोकोभी मुह फेरते देखा है मैने …. 


मै लिखु या ना लिखु, तु क्या चाहता है फराज,
जुबान भी बंद रखु, और कलम भी, ये तो होनेसे रहा ….


दिल कि धडकनोका अंदाज बया करू कैसे,
तुझे चाहता हुं, ये तुझसे कहू कैसे,
इसी कश्मकशमे रहता है दिल आज कल,
जो तु रूठ जाये, तो तुझे मनाऊ कैसे …. 


तु बता दे मुझे ए जिंदगी,
क्या गुजरेगा ये वक़्त भी,
इंतजार कर रहे है आज जिनका,
क्या कल दीदार करेंगे वोह भी ....


तु दिखती रहे हमेशा, ये जरुरत नही मेरी,
तु है कही आसपास, इतना काफी है,
तुभी प्यार करे मुझसे, ये जरुरत नही मेरी,
तुझे एहसास है, इतना काफी है …. 


तुझी आठवण :

अवचित मनामध्ये तुझी आठवण येते,
वाटते तु जवळच आहेस कुठेतरी,
दिसत नाहीस पण, तुझे अस्तित्व जाणवत राहते. 
शोधतो मी तुला वेड्यासारखा,
मागोवा घेतो तुझा पराग शोधणाऱ्या भुंग्यासारखा,
अस्ताला जाणाऱ्या सुर्याबिम्बाचा पाठलाग करणाऱ्या पक्षासारखा,
थकुन जातो मग आणि विसावतो एका जागी,
पण तुझी आठवण जात नाही मनातुन,
ती मात्र तशीच मनामध्ये असते,
नुकत्याच फुललेल्या मोगऱ्यासारखी ताजी,
विसरायचा प्रयत्न करतो तुला,
पण तुझा गंध जाणवत राहतो,
तु आहेस इथेच, मला तो गंध सांगत राहतो,
भिरभिरत्या नजरेने शोधतो तुला पुन्हा पुन्हा,
का हि छळणूक जीवाची, सांग, केला मी काय गुन्हा,
विचार करून मग, माझे मलाच हसु येते,
मनात असलेल्या तुला, वेडे मन, बाहेर शोधत होते,
असेच होते जीवाचे, तुझी आठवण आली की,
भेटावे वाटते तुला, तुझी आठवण आली कि,
मन वेडेपिसे होते मग, तुझी आठवण आली कि,
मनांत असलेल्या तुला मी शोधत राहतो आसपास,
तुझी आठवण आली की …


सखी :

मैत्र आणि प्रेयसीच्या पलीकडे, ती उभी असते,
कठीण प्रसंगी तीच, तुमचा आधारस्तंभ असते,
सांगुन टाकावे सर्व असे, तीला पाहुन वाटते,
मानापमान झेलुन सारे, कायम हसरी असते,
तिच रागावणे आपण, मनावर घ्यायचे नसते,
आपले चिडणे, ती पण मनावर घेत नसते,
मनात येईल ते सार, तिला डोळे झाकुन सांगावे,
तिने पण ते गुपित, हरवल्यासारखे संभाळावे,
हक्क म्हणजे काय, ते तिच्याकडे बघुनच कळते,
ती पण हातचे राखुन न ठेवता, देऊन टाकत असते,
वेळ काळाच बंधन तिच्याकडे  नसते,
तिच्यासाठी मग, कायपण, हि आपली तयारी असते,
मैत्रीच्या भावबंधाना ती पुरेपूर जागते,
प्रेयसीच्याही वरचढ, तिची जागा असते,
अशी सखी सर्वांनाच हवीहवीशी वाटते, 
अशी सखी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. 

Thursday, 25 June 2015



पाउसाला म्हंटले येऊन जा जरा,
त्रासलेल्या धरतीला सुखावून जा जरा,
किती तुझी पहावी वाट, तूच सांग तीला,
प्रेमधारा तुझ्या बरसवून जा जरा. 

येतोस तर कसा, वेड्यासारखा येतोस,
वाऱ्याच्या संगतीने पाठशिवणी खेळतोस,
एकांती कधी भेटशील, तर खरा,
ये आणी, प्रेमधारा तुझ्या बरसवून जा जरा. 

तुझ्या येण्याने धरती कशी खुलते बघ,
हिरवा शालू नेसुन कशी नटते बघ,
लाजेचा फुलोरा तिच्या गाली दिसतोय बरा,
आलाच आहेस तर, प्रेमधारा तुझ्या बरसवून जा जरा.

असा कसा रे तु, तुला काहीच कळत नाही,
आल्या आल्या तुला, परत जायची घाई,
कसे दिस काढावे, विचार कर जरा,
प्रेमधारा तुझ्या बरसवून जा जरा. 
प्रेमधारा तुझ्या बरसवून जा जरा. 

आज हे काय, झाले कळेना ,
तुझे चित्र काही, केल्या ढळेना,
का आठव ये तुझी, सांगू कुणाला,
कसे भान ठेऊ, काही कळेना.

वाटे तुझी कविता करावी,
आस तुझी शब्दांत भरावी,
धुंदिपुढे या काही स्मरेना,
कसे भान ठेऊ, काही कळेना.

चित्र काढण्या कुंचला धरावा,
न रेखाटता काही, तेथेच फिरावा,
रंगांचा मग त्या अर्थ मिळेना,
कसे भान ठेऊ, काही कळेना.

तुला आठवता माझा मी न उरतो,
कुणास सांगू मनात झुरतो,
कसे पहावे तुला, काही कळेना,
आज हे काय, झाले कळेना,
कसे भान ठेऊ, काही कळेना.

Sunday, 31 May 2015



लोग जिसे मोहोब्बत कहते है,
वोह तो मैने कभी कि हि नही,
मेरा तो अपना हि एक अंदाज था,
पर शायद उसे वोह, समझा हि नही ….


आठवणी आणि कॉफी :

पहिल्यांदाच, कॉफी शॉपमधे एकटा बसलो होतो,
तुझ्याच आठवणीत रमलो होतो,
वाफाळत्या कॉफीचा मग समोर होता,
आणि मनात होत विचारांच वादळ,
बघता बघता मन किती तरी मागे गेल,
पहिल्यांदा आपली भेट झाली तिथे येउन थांबलं,
अशीच संध्याकाळची वेळ होती,
तु येशील का याबद्दल शंका होती,
आलीस तु, पण बोलण्यात तुझ्या जायची घाई होती,
नंतर मात्र तु बराच वेळ होतीस, 
कॉफी बरोबर गप्पात रंगली होतीस,
किती पटकन संपली ती संध्याकाळ आणि ती वेळ, 
आजही त्या पहिल्या कॉफीची चव जिभेवर रेंगाळते आहे,
आज तु नाहीस बरोबर, पण ती आठवणच मला तगवते आहे,
कशाने आला दुरावा काही समजत नाही,
पण गप्पांना आता पहिल्यासारखा रंग भरत नाही,
भेटणं राहिल आहे  उपचार, आणि कॉफी फक्त सोपस्कार,
कधी भेटलीस शेवटच ते आठवत नाही आता,
पण तेव्हाही साक्षीला, हा कॉफी मगच होता,
आता उरल्या आहेत फक्त तुझ्या आठवणी,
कधी कधी उसळतात त्या, वाफाळत्या कॉफीसारख्या,
मग येउन बसतो त्याच ठिकाणी, आज आलोय तसा,
वाट बघत, कॉफी थंड व्हायची …… 

वाटे कधी मनाला, कविता करावे , 
मनी तुला स्मरावे, अन काव्य,
अलगद स्फुरावे. 

पहाटबिंदू जसे, पानांवर तरावे,
रुपगौरव तुझे, शब्दांत उतरावे. 
तू वसता मनांत, हे सहजचि व्हावे,
मनी तुला स्मरावे, अन काव्य, 
अलगद स्फुरावे. 

तुझेच चित्र नयनी वसावे,
तुझेच नाव हृदयी ठसावे,
तु नसता माझे मी पण नुरावे,
मनी तुला स्मरावे, अन काव्य, 
अलगद स्फुरावे. 

वेड्या जीवाने किती झुरावे,
दिसलीस तु, हे कल्पित जावे,
तुझी याद येता, भान हरपुन जावे,
मनी तुला स्मरावे, अन काव्य, 
अलगद स्फुरावे.

वाटे कधी मनाला, कविता करावे , 
मनी तुला स्मरावे, अन काव्य,
अलगद स्फुरावे. 

Wednesday, 27 May 2015

मैत्रीण :

एक तरी अशी मैत्रीण हवी,
जिच्यामुळे जगण्याला धुंदी यावी
बिनधास्त मनाला येईल ते बोलणारी,
आपण काय बोलु ते ऐकुन घेणारी
आपल्या चुकांवर कान पकडणारी,
चुका सुधारण्यात मदत करणारी
पुर्ण विश्वास ठेवणारी,
आपला विश्वास सार्थ ठरवणारी
न चुकता काहीतरी आणणारी,
आपण काही दिल तर, लटके रागावणारी
व्यवहाराचे चार शब्द सुनावणारी 
आपल्या मौनाचा अर्थ समजणारी
आपल्या दुखः आत सहभागी होणारी 
सुखाने हरखून जाणारी,
भरभरून बोलणारी, समरसून जगणारी,
मैत्रीच्या भावनेला पुर्ण जागणारी,
खरोखर अशी एक तरी मैत्रीण हवी,
जिच्यामुळे जगण्याला धुंदी यावी

Tuesday, 26 May 2015


एक होता दादा :

एकटाच भटकत होतो, मस्तवाल वळूसारखा वाट तुडवत,
जगत होतो जीवन, सडाफ़टिङ्गाचे,
शब्दाला शब्द भिडवीत होतो, गळ्यात रुमाल अडकवुन,
तु येऊन रुमालाला त्याची जागा दाखवलीस. 
मस्तीत जगत होतो आपल्याच, सर्व नियम धाब्यावर बसवून,
समाजाच्या दृष्टीने नालायकीचे. पण नशा होती त्यात. 
भाषेचं बंधन नव्हतं, कोणाच्या नावाचं स्पंदन नव्हतं, 
होता फक्त अफाट पसरलेला समुद्र, आणि त्यात मी एकच देवमासा. 
लोकांना आकर्षण होत, पण घाबरायचे जवळ यायला, 
मागुन शिव्या द्यायचे, पण जळायचे माझ्या बिनधास्तपणावर तिच्यामायला,
तु येऊन सभ्यतेच्या चौकटीत बांधून टाकल,
मनात नसताना केवळ तुझ्यासाठी वेसण घालून घेतलं. 
या बेगडी समाजाचे नियम पाळताना या वाघाच पार कुत्रे झाले ,
जे नुसत्या डरकाळिने ओले व्हायचे ते खांद्यापर्यंत पोचू लागले,
किती ती जगण्यासाठी लाचारी आणि किती तो खोटेपणा,
मी माझ्या जगात मस्त होतो, तिथे नव्हता असा हडकुळेपणा. 
काय ती कपड्याची मस्ती आणि काय ती अत्तराची फवारणी,
मन साल्यांची काळी यांची, शब्दात फक्त बतावणी. 
व्यसन पण साले लपून करतात, नजरेत यांच्या वासनेचा महापूर,
मला म्हणतात तू साल्या लफडेबाज, आम्ही सभ्यतेचे अंकुर. 
हेच सभ्य जीवन मी जगावं, अस तुला वाटत होत का ?
यांच्याप्रमाणे मी हि दांभिक व्हावं, हेच तुला अपेक्षित होत का ?
दादा म्हणुन वाढलो जिथे, तिथे पार तात्या झाला आता,
आकाशाला भिडले असते आगीचे लोळ, पण धग शांत झाली आता. 
जगण्यामधला मजाच संपला, आता राहिल फक्त आयुष्य,
अजूनही कधी कधी अस वाटत, साला करून टाकावेत हे रस्ते पुन्हा निर्मनुष्य. 
काय सांगु तुला, काय वाटे मला,
पाहुनी वाट रे , जीव झाला खुळा. 

शब्द ओठांमधे राहिले थांबुनी,
अर्थ शब्दांमधे राहिले गोठुनी,
द्वंद्व हे रेशमी, समजेल का तुला,
पाहुनी वाट रे, जीव झाला खुळा. 

मन हि गुंतले, आठवणींत तुझ्या,
भाव डोळ्यांमध्ये, वाच कि तु माझ्या, 
गोड संवेदना, कळतील का तुला,
पाहुनी वाट रे, जीव झाला खुळा. 

काय सांगु तुला, काय वाटे मला,
पाहुनी वाट रे , जीव झाला खुळा. 

Sunday, 12 April 2015

तू जिक्र ना कर, कोई बात नही,
मैं फिक्र ना करू, कोई बात तो है.
तू रुसवा कर मुझे, कोई बात नही,
तेरी बेरुखी मैं सहु, कोई बात तो है.

मेरी चाहत को तुने अब तक ना पहचाना,
मेरी दिल्लगी को तुम कभीभी आजामना,
फिरभी परदा मुझसे, कोई बात नही,
मैं तनहा रहु तुझसे, कोई बात तो है.

दिन निकल रहे हैं, तेरे इंतजार मे,
रातें जाग रही हैं, तुझे याद करनेमे,
तुम मिलो ना मुझसे, कोई बात नही,
मैं दूर रहु तुझसे, कोई बात तो है.

एक ऐसी सवेर हो, जब हम मिलेंगे फिरसे,
कोई फासले ना रहे, जब हम मिलेंगे फिरसे,
इसपर भी ये तेरा  ऐतराज, कोई बात नही,
तेरे ऐतराज पे मुझे गम ना हो, कोई बात तो है.
वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर :

शाळेचा पहिला दिवस या विषयावर भरपूर निबंध लिहून झाले आहेत, आणि ते बऱ्याचदा भावनाशुन्य आणि एका साच्यातले वाटतात. पण वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर या विषयावर लिहिलेलं आठवत नाही कोणी. कारण झालं काय, आज सकाळी मी आणि श्री बाहेर पडलो आणि रस्त्यावर शाळेतील मुल आनंदात, गोंधळ घालत येताना दिसली. तेव्हा लक्षात आल कि आज वार्षिक  परीक्षेचा शेवटचा पेपर होता. म्हणजे उद्यापासून शाळेला सुट्टी. त्या मुलांचा आनंद चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मन भूतकाळात गेल. आपण पण विद्यार्थी असताना हेच तर करत होतो. शेवटच्या पेपरला जातानाच आनंद व्हायचा कि आजचा पेपर दिला कि सुटलो यावर्षीच्या अभ्यासाच्या कचाट्यातून. मग उद्यापासून काहीहि करायला मोकळीक. असा व्हायचं कि कधी एकदा ती शेवटची ओळ लिहितोय आणि पेपर बाईंच्या सुपूर्द करून घरी पळतोय. त्यावेळी जो आनंद व्हायचा ना मित्रानो त्याची तुलना आज लाख रुपये कमावले तरी होऊ शकत नाही. किती निरागस आनंद होता तो. कसलीही अपेक्षा किंवा हाव नाही त्यात, असेल तर फक्त आनंद आणि आनंदच. आताश्यासारखे तेव्हा वेगवेगळे अभ्यासक्रम नव्हते. सर्व शाळांचा बहुधा एकच सामायिक अभ्यासक्रम असायचा व सर्वांच्या परीक्षा एकाच वेळेस असायच्या. त्यामुळे व्हायचं काय कि सर्व शाळांची मुल एकाच वेळेस सुटायची व रस्त्यावर एकच गोंधळ माजायचा. त्या शेवटच्या दिवशी काही जुने हिशेब पण चुकते व्हायचे. पण एकूणच रस्त्यावर वेगवेगळ्या गणवेशातील मुलामुलींची यात्राच चालू आहे असा वाटायचं. त्यावेळी चेहेऱ्यावर दिसणारी ती प्रफुल्लता क्वचितच वर्षभरात दिसायची. निकाल काय लागेल याची तमा ना बाळगता चाललेला आनंदोत्सव अनुभवण्यासाठी पुन्हा विद्यार्थीच व्हायला पाहिजे. आज त्या मुलांना पाहून खरोखर डोळ्यात पाणी आले आणि ते विद्यार्थीदशेतले दिवस परत आठवले.

Monday, 6 April 2015

इतना गम ना दे मुझे जिंदगी,
के इनकोहि मै जिंदगी समझ लू,
कभी तो फुरसत दे मुझे इनसे,
कही इनसेहि मै मुहोब्बत ना कर लू ......



जिंदगी जीनेकेलीये लम्होंका इंतजार ना कर,
खुशीयोको समझनेकेलीये गमोका इंतजार ना कर,
अपना हौसला खुद बुलंद कर बंदे,
कश्तीको किनारे लगानेकेलीये माझी का इंतजार ना कर .......



मै तो पत्थरोको तोडने चला था,
किसे पता था, उसमे तेरा दिल भी होगा ......


परायेपनका अहसास तब हुआ,
जब मैने बीना दस्तक दिये घरमे कदम रख्खा,
और तुम्हारे चेहरेकी सिलवटे बदल गयी .......


अपनीही परछाईसे कबसे डरने लगे तुम, 
शायद अंधेरोसे यारीया बढ गयी है तुम्हारी ......


अगर शिद्दत ना होती, तो तुझसेहि प्यार क्यो करता,
हारनेका डर होता, तो दिल का कारोबारहि क्यो करता .....


तेरी चौखटपे जान जाये, तो  इल्जाम अपने सर मत लेना,
कह देना,  दिवाना था कोई, अंजाम पा गया ......

Friday, 3 April 2015

अपने दिलसे मेरा नाम मिटानेकि कोशिश ना कर दोस्त,
दिल टूट जाएगा, पर नाम ना मिट पाएगा .......GC

तुम्हारी आखोने गिरफ्त कर लिया हमे,
वरना हम भी कभी आझाद थे .......GC

मैं इसलीयेभी अपने प्यार का जिक्र नही करता दोस्त,
किसी और को जिंदगी जिनी हो तो मेरी उम्र ले ले .......GC

वो आदतसे मजबूर थे, और मैं अपनी फ़ितरतसे,
वो इन्कार करते रहे, और मैं मुहोब्बत करता रहा उनके इन्कारसे ........GC

अब निंद भी धोखा देने लगी है दोस्त,
आती भी तब है जब उसकी याद सताने लगे .......GC

हमसे मुहोब्बत नही तो नफरत हि सही दोस्त,
बस याद करते रहना, येही काफी है ......GC

बेवफा होना इतना आसां होता दोस्त,
तो आज हम भी तेरे शहर मे होते ......GC

तेरे चेहेरे पे इतनी सुर्खीया क्यो हैं,
उम्र बढ गयी, या दिवाने कम हुए ......GC

मेरी निंदे चुराली उसने दोस्त,
और कहते हो के अब, चैनसे सो जाओ ......GC

तुम कहते हो कि सरेआम बातें ना कर मेरी,
पर क्या तुम अपनी फ़ितरतसे वाकीफ नही .......GC

वादा करना कोई तुमसे सिखले दोस्त,
ना निभाने कि जरुरत, ना टुटने का गम ........GC

Tuesday, 31 March 2015

कोई और नशा, क्या नशा दे पाएगा,
जो तेरी आंख के आंसू पिनेसे मिल जाएगा .....GC

ये मौसम का जादू है, या तेरी चाहत का असर,
हर बातमे अब जिंदगी नजर आती है ......GC

कितना असर है, तुम्हारे आसुओमे,
जिन्होने अंदरसे पिघला दिया मुझे,
बारीश कि बुन्दोमे वो असर कहा, 
जो बस भिगोके चले गये .......GC

तुम्हे देखना है तो, आंखे बंद करनेकी देरी है,
मिलता हुं इसलिये, कि तुम्हे पढ सकू ......GC

तेरी तस्वीर मैं, लफ़्जोमे उतारता हुं, 
लोग इसेही शायरी कहते है शायद ......GC

तुम्हारे डर का जवाब नही है मेरे पास,
पर क्या इतना काफी नही कि, तुम मेह्फुझ हो मेरे साथ .......GC

प्यारमे इतनी बेसब्री अच्छी बात नही,
बेकरारिका मौका कभी हमे भी दिया करो .......GC