वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर :
शाळेचा पहिला दिवस या विषयावर भरपूर निबंध लिहून झाले आहेत, आणि ते बऱ्याचदा भावनाशुन्य आणि एका साच्यातले वाटतात. पण वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर या विषयावर लिहिलेलं आठवत नाही कोणी. कारण झालं काय, आज सकाळी मी आणि श्री बाहेर पडलो आणि रस्त्यावर शाळेतील मुल आनंदात, गोंधळ घालत येताना दिसली. तेव्हा लक्षात आल कि आज वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता. म्हणजे उद्यापासून शाळेला सुट्टी. त्या मुलांचा आनंद चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मन भूतकाळात गेल. आपण पण विद्यार्थी असताना हेच तर करत होतो. शेवटच्या पेपरला जातानाच आनंद व्हायचा कि आजचा पेपर दिला कि सुटलो यावर्षीच्या अभ्यासाच्या कचाट्यातून. मग उद्यापासून काहीहि करायला मोकळीक. असा व्हायचं कि कधी एकदा ती शेवटची ओळ लिहितोय आणि पेपर बाईंच्या सुपूर्द करून घरी पळतोय. त्यावेळी जो आनंद व्हायचा ना मित्रानो त्याची तुलना आज लाख रुपये कमावले तरी होऊ शकत नाही. किती निरागस आनंद होता तो. कसलीही अपेक्षा किंवा हाव नाही त्यात, असेल तर फक्त आनंद आणि आनंदच. आताश्यासारखे तेव्हा वेगवेगळे अभ्यासक्रम नव्हते. सर्व शाळांचा बहुधा एकच सामायिक अभ्यासक्रम असायचा व सर्वांच्या परीक्षा एकाच वेळेस असायच्या. त्यामुळे व्हायचं काय कि सर्व शाळांची मुल एकाच वेळेस सुटायची व रस्त्यावर एकच गोंधळ माजायचा. त्या शेवटच्या दिवशी काही जुने हिशेब पण चुकते व्हायचे. पण एकूणच रस्त्यावर वेगवेगळ्या गणवेशातील मुलामुलींची यात्राच चालू आहे असा वाटायचं. त्यावेळी चेहेऱ्यावर दिसणारी ती प्रफुल्लता क्वचितच वर्षभरात दिसायची. निकाल काय लागेल याची तमा ना बाळगता चाललेला आनंदोत्सव अनुभवण्यासाठी पुन्हा विद्यार्थीच व्हायला पाहिजे. आज त्या मुलांना पाहून खरोखर डोळ्यात पाणी आले आणि ते विद्यार्थीदशेतले दिवस परत आठवले.

No comments:
Post a Comment