Sunday, 22 November 2015

मुंबई पुणे मुंबई २ :

दिग्दर्शक सतीश राजवाडे. एक नावाजलेलं नाव. दूरदर्शनवरच्या काही नामांकित मालिका लिहिणारा, कसदार अभिनय करणारा आणि दिग्दर्शन करणार नामवंत व्यक्तिमत्व. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशस्वी प्रदर्शनानंतर आणि मिळालेल्या घवघवीत यशाने अपेक्षा वाढवणार नाव. पण दुसऱ्या भागात पूर्ण अपेक्षाभंग करणार पण हेच नाव. कोणी म्हणेल कि हा ईसम चित्रपटाबद्दल लिहायचं सोडून दिग्दर्शकाच्या मागे का लागलाय. कारण माझ्यामते जसे एखाद्या चित्रकाराला चित्र काढायच्या आधीच ते चित्र डोळ्यांसमोर दिसत असते, तसेच लेखकाला व दिग्दर्शकालापण आपली कलाकृती जाणवत असते, जाणवली पाहिजे. ती जर का नसेल जाणवत तर राजवाडे आणि इतरांमध्ये मग काय फरक.

या चित्रपटाची एकच जमेची बाजू म्हणजे, स्वप्नील जोशीचा अभिनय. पहिल्या भागातही त्याने उत्तम अभिनय केलाच होता, परंतु या भागात त्याने मुक्ता बर्वे सारख्या कसदार अभिनेत्रीला निष्प्रभ करण्याइतपत जबदरस्त अभिनय केलाय अस म्हणायला नक्कीच वाव आहे. मी काही स्वप्नील जोशीचा चाहता वगैरे नाही. खरतर, मला मुक्ताचा अभिनय आणि तिचा वावर खूप आवडतो. पण का कुणाश ठाऊक पण पहिल्या भागात सराईत अभिनय करणारी मुक्ता या भागात कुठे दिसलीच नाही.

चित्रपटाच कथानकही फारच बाष्कळ गोष्टीवर रेंगाळत ठेवल्यासारख वाटत. लग्नासारखा महत्वाचा निर्णय, लग्न दोन दिवसांवर आल तरी मुलगी घेत नाही आणि मुलगा पण तोवर तिची वाट बघतो हे मनाला अजिबात पटत नाही. अगदी दिग्दर्शक राजवाडे असले तरी.

चुकीच्या निर्णयावर किवा निर्णय न घेतलेल्या निर्णयावर आपण म्हणु, मुलीला सावरून घेणाऱ्या आणि तिला एकट पडू न देणाऱ्या बापाच्या भूमिकेला मात्र सलाम. कित्येकदा आपले निर्णय चुकतात, पण कोणी पाठीराखा मिळत नाही मग आपण एकतर कोसळतो किंवा मग कधी कुठले निर्णय एकहाती घेत नाही. लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करतो. पण इथे तिच्या अवघडल्या अवस्थेत तिच्या वडिलांनी साथ दिलेली दाखवून दिग्दर्शक राजवाडेनि थोडी भरपाई केली आहे.

बाकी सर्वांचे अभिनय ठीकठाक.

कशासाठी बघावा हा चित्रपट : समजूतदार वडिलांसाठी आणि स्वप्नील जोशीच्या अभिनयासाठी
का बघू नये : न पटणार कथानक

मी हा चित्रपट पुन्हा बघणार नाही, अगदी मराठीचा अभिमान असला तरीही.

4 comments:

  1. सडेतोड आणि रोखठोक .....सलाम कुबूल किजीये जनाब !

    ReplyDelete
  2. सडेतोड आणि रोखठोक .....सलाम कुबूल किजीये जनाब !

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेखन. तसाही हा चित्रपट मी पहाणार नव्हतोच.आधीच सावधान केल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेखन. तसाही हा चित्रपट मी पहाणार नव्हतोच.आधीच सावधान केल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete