Tuesday, 31 March 2015

कोई और नशा, क्या नशा दे पाएगा,
जो तेरी आंख के आंसू पिनेसे मिल जाएगा .....GC

ये मौसम का जादू है, या तेरी चाहत का असर,
हर बातमे अब जिंदगी नजर आती है ......GC

कितना असर है, तुम्हारे आसुओमे,
जिन्होने अंदरसे पिघला दिया मुझे,
बारीश कि बुन्दोमे वो असर कहा, 
जो बस भिगोके चले गये .......GC

तुम्हे देखना है तो, आंखे बंद करनेकी देरी है,
मिलता हुं इसलिये, कि तुम्हे पढ सकू ......GC

तेरी तस्वीर मैं, लफ़्जोमे उतारता हुं, 
लोग इसेही शायरी कहते है शायद ......GC

तुम्हारे डर का जवाब नही है मेरे पास,
पर क्या इतना काफी नही कि, तुम मेह्फुझ हो मेरे साथ .......GC

प्यारमे इतनी बेसब्री अच्छी बात नही,
बेकरारिका मौका कभी हमे भी दिया करो .......GC
अपने चेहेरेको युही ढके रखो मेहेरबान,
दुनिया मे दिवानोकी कमी नही ......GC

सच्ची मुहोब्बत करता है कोई, तो उसे तंग ना करो,
वो ऐसेही परेशान है, उसे और परेशान ना करो ......GC

उसकी हंसी ने कोई सौदा किया है उससे शायद,
इन्कार भी करती है तो मुस्कुराते हुए ......GC

मुझसे वफाकी उम्मीद ना कर फराज,
टुटा हुआ दिल लेके आजभी जिंदा हुं, ये क्या कम है ......GC

कोई और नशा, क्या नशा दे पाएगा,
जो तेरी आंख के आंसू पिनेसे मिल जाएगा .....GC

ये मौसम का जादू है, या तेरी चाहत का असर,
हर बातमे अब जिंदगी नजर आती है ......GC

कितना असर है, तुम्हारे आसुओमे,
जिन्होने अंदरसे पिघला दिया मुझे,
बारीश कि बुन्दोमे वो असर कहा,
जो बस भिगोके चले गये .......GC

तुम्हे देखना है तो, आंखे बंद करनेकी देरी है,
मिलता हुं इसलिये, कि तुम्हे पढ सकू ......GC

तेरी तस्वीर मैं, लफ़्जोमे उतारता हुं,
लोग इसेही शायरी कहते है शायद ......GC

तुम्हारे डर का जवाब नही है मेरे पास,
पर क्या इतना काफी नही कि, तुम मेह्फुझ हो मेरे साथ .......GC

प्यारमे इतनी बेसब्री अच्छी बात नही,
बेकरारिका मौका कभी हमे भी दिया करो .......GC

Friday, 27 March 2015

आईने को समझनेमे गलती कर दी मैने,
वो मेरी हकीकत बयां कर रहा था,
और मै किसी औरको मुझमे देख रहा था .......GC


उसने पुछा, क्या ख्वाबोमेभी हमे हि देखते हो,
कैसे कहे उसे के,
निंद जागनेकेलीये उसकी याद हि काफी है .....GC
शेतकऱ्यांच्या राज्यात, शेतकरीच झाला त्रस्त, काळी माय गहाण ठेऊन, झाला धरणिग्रस्त. आणि काय म्हणता तुम्ही राव, गर्जा गर्जा महाराष्ट्र. हवालदिल जनता आणि नोकरशाही भ्रष्ट, खिशामध्ये माल असेल, तरच काम मस्त, तरी पण म्हणता तुम्ही, गर्जा गर्जा महाराष्ट्र. समाजकारणाच्या नावाखाली राजकारणी धष्टपुष्ट, विकासाचे लोणी यांनी कधीच केले फस्त, बोंबलत बसा तुम्ही मग, गर्जा गर्जा महाराष्ट्र. बिल्डरांना चाप नही, जंगले झाली नष्ट, कितीही तक्रार करा तुम्ही, कायदा प्रशासन सुस्त, आणि तुम्ही आम्हाला सांगा, कि गर्जा गर्जा महाराष्ट्र. फुले-आंबेडकरांची नावे घेता, पण नाही कोणालाच शिस्त, सवलतींच्या बाण्डगुळावर अजून यांची भिस्त, आणि कस काय सांगता तुम्ही कि, गर्जा गर्जा महाराष्ट्र. सुधारकांच्या या महाराष्ट्राला, लागली कोणाची दृष्ट, चला उठुया, साफ करूया समाजाचे हे कुष्ठ, आता म्हणा ना तुम्ही पण, गर्जा गर्जा महाराष्ट्र .

Thursday, 26 March 2015


किससे शिकायत करू मैं तेरी,
यहां सब तेरे चाहनेवाले हैं,
ये शहर तेरा दिवाना है,
और हम भी तेरे दिवाने हैं .


खेलना बुरी बात नही,
शर्त ये हैं कि,
किसीके दिल से मत खेलना .



पानीभी अपने दाग छोड जाता है,
और तुम कहते हो, तुमपे मेरा असर हुआ है   ........GC

उस दिन का इंतजार रहेगा मुझे,
जिस दिन तू मुझे याद करेगा,
मै रहूंगा सफेद चादर ओढे,
शायद तब तू मुझे मिलने आएगा  ........GC

अच्छा हुआ प्यार कि कोई उम्र नही होती,
इसीलिये वो आज भी जिंदा है ........GC
9:27 AM
एक वजह थी तुम, जीने के लिये,
एक मजहब थी तुम, मरने मिटने के लिये,
न जाने गुलिस्ता मे कैसी हवाये आयी,
जो मजबुर हुए तुम, हमसे दूर जाने के लिये ...... GC

Wednesday, 25 March 2015

नेहमीच तशी ती बरोबर असते, मनामध्ये ती कायमच वसते, पण कधीतरीच तिच्यातली "ती" भेटते. बघावं तेव्हा ती घाईतच असते, कधीतरीच, सायंकाळच्या सावलीसारखी विसावलेली भासते, पण जेव्हा भेटते तेव्हा मात्र, जीवन व्यापून टाकते. तिची भेट म्हणजे एक पर्वणी असते, भरभरून बोलते, खळखळून हसते, मनात असेल ते सर्व सांगून टाकते. हसता हसता भांडते, आणि भांडताना लगेच हसते पण. रुसणं पण तीच मजेदार असत, मनातलं हसू चेहेऱ्यावर दिसत. ती म्हणजे, मोकळा श्वास असते, ती म्हणजे, मन प्रफुल्ल करणारा सहवास असते, ती म्हणजे, धुंद मोगरीचा सुवास असते, आणि चमचमत्या ताऱ्यांची बरसात पण तीच असते. अशी ती फार कमी वेळा भेटते, जाताना आठवणी मात्र खूप देऊन जाते. मनावर तिच्या ताजेपणाची मोहोर उमटवून जाते, पण हे तेव्हाच शक्य होत, जेव्हा ती "तिला" घेऊन येते, जेव्हा ती "तिला" घेऊन येते.
जीवनाच्या संध्याकाळी तरी भेटशील का सांग, मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग. दिवसा मागून दिवस हे सरले, तुझ्या आठवणीशीवाय हाती काही न उरले, त्या आठवणीना उजाळा देशील का सांग, मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग. तुला पाहिले तुझाच होऊन गेलो, कळलेच नाही कधी वाहवत गेलो, तू पण संगे येशील का सांग, मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग. तुझ्या मनाचा थांग कधी लागलाच नाही, पण कधी तू निराश पण केले नाही, आता तरी मन उघड करशील का सांग, मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग. जगण्याची उमेदही संपून गेली, येशील तू कधी, आसहि नुरली, सरणावर तरी दोन अश्रू ढाळशिल का सांग, मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग.

Monday, 23 March 2015

जातीभेद अमंगळ,
होतसे दुष्टांची चंगळ,
असत्याची ती दंगल,
सर्वार्थी //1//
या शतकामीशी,
त्वा जातीभेद पाळीशी,
बुध्दी गहाण ठेविशी,
काय कि जे //2//
देवाने सर्वां निर्मिले,
भेदाभेद नाही पाळिले,
तुम्ही काय म्हणोनी सर्वां छळिले,
कैसे हे कर्म //3//
या सुजलाम भुमीवरी,
सर्व प्राणिमात्र एकसरी,
एकोप्याने संसार करी,
जी सी म्हणे //4//

Tuesday, 17 March 2015

जीवनात असे ही काही मैत्र भेटतात,
जे एकाच कारणासाठी, वेगवेगळ्या तऱ्हेने वागतात.
पण, फक्त सहन करणं असत आपल्या हातात,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.

अस का केलत म्हणुन त्यांना विचारायचं नसत,
तिऱ्हाइताप्रमाणे फक्त पहायचं असत,
अशावेळी त्यांच्या वागण्यावर आपणच पांघरूण घालायची असतात,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.

कधी कधी उबग येतो अशा वागण्याचा,
राग येतो, पण अधिकार नसतो आपल्याला रागावण्याचा,
ते मात्र आपल्याच निर्णयावर खुश असतात,
पण काय करणार,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.

विश्वास ठेवावा, त्याचा वेगळाच चेहेरा समोर येतो,
कोणाच्या खांद्यावर हात ठेवावा, असा मग प्रश्न पडतो,
अनुभवाने कळलय की, अश्या प्रश्नांची उत्तर शोधायची नसतात,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.
वो खामोशीसे क्त्ल कर गया,
और हमे पता भी ना चला,
हम तो उन्हे हमदर्द समझ रहे थे,
पर कब वो दर्द दे गया,
हमे पता ही ना चला.

Saturday, 7 March 2015

मै प्यार नहीं करता ऊनसे,
ना वोह मुझसे,
पर ना मै ऐतबार करता हुं इस बातसे,
ना वोह मुझसे। (१)

कोईभी रंग उसपे बखुबी खुलता है,
पर गजबकी बात तब है,
जब वो अपनेही रंगमे घुलता है । (२)

मेरी कमजोरी उन्हे पता चल चुकी है,
अब वोह बोलते नहीं कुछ,
बस मुस्कुरा देते हैं। (३)

मैं नहीं जानता की तुम मेरे कौन हो,
बस इतना पता है,
बिन तेरे मैं मैं नहीं रहता।
लोग भी कहते हैं,
तु बोल रहा है कुछ,
और तेरा चेहरा कुछ है कहता। (४)

मेरी आवारगीका तुझपेभी असर होने लगा है,
अब तुभी दुनियासे बेखबर,
और मिलनेकेलिए बेसब्र होने लगा है । (५)

काश खुदाने मुझेभी इतना खुबसुरत बनाया होता,
तो मेरी तरह, तुनेभी मुझे अपने दिलमे छुपाया होता । (६) 

Monday, 2 March 2015

क्यो बढ गयी है दुरिया,
क्यो खामोश है मजबुरीया,
हम दिल के इतने पास है फिर भी,
क्यो है ये तनहाइया.

क्यो बदल गये रिश्ते अपने,
क्यो बढ गये ये फासले,
क्यो बेबस है हम वक़्त के हातो,
क्यो है ये विरानिया,
हम दिल के इतने पास है फिर भी,
क्यो है ये तनहाइया.

ना तुम कुछ कहो ना हम,
ना दिल कुछ सहे ना गम,
क्यो बेखौफ नही थी जिंदगी अपनी,
क्यो है ये बेचैनिया,
हम दिल के इतने पास है फिर भी,
क्यो है ये तनहाइया.

Friday, 27 February 2015

तिला रोखल नाही त्याने, कारण
थांब म्हंटलं तरी ती थांबणार नव्हती,
त्याची काय अवस्था होईल, ती ते पाहणार नव्हती.
फार दिवसांची मैत्री नव्हती त्यांची,
पण  मैत्री कुठल्या मापाने मोजायची,
ती भेटल्यास दिवस चांगले गेले,
हसणे, रुसणे, चिडणे सर्व  अनुभवले,
पण कशातच ती जास्त रमायची नाही,
नक्की कशात गोडी आहे तिला,
पटकन कधी कळायचंच नाही,
तिच्याबाबतीत तो जर हळवा होता,
तिला आनंदी बघण्यासाठी झटणारा होता,
ती  थोडं अंतर ठेऊनच असायची,
तो वहावयाचा, ती मात्र नेहमीच भानावर असायची.
हळुहळू मैत्रीत मर्यादा यायला लागली,
त्याने तीच ऐकायचं, ती मात्र आपल तेच खर करायला लागली,
तो कितीही चिडला तरी, तीचा शब्द कधी मोडायचा नाही,
तिला आठवत नसलेल्या गोष्टी, तो मात्र कधीच विसरायचा नाही,
तीचा मूड सांभाळायचा कसोशीने प्रयत्न करायचा,
पण आजकाल तीचा मूड कशानेही बिघादायाचा,
तिने मग त्याला टाळायला सुरुवात केली, भेटणं तर दुर्लभ,
काहीबाही कारण सांगुन बोलेनाशी झाली,
एक दिवस म्हणाली, भेटायला ये,
भेटली आणि फक्त गप्प बसून राहिली,
काय चाललंय मनात कळत नव्हत,
आज तिला छेडायच नाही, त्याने पण ठरवलं होत,
जाताना एवढंच म्हणाली, जाते, परत भेटणार नाही,
त्याने पण तिला जाऊ दिला, कारण विचारलं नाही,
कारण, थांब म्हंटलं तरी ती थांबणार नव्हती,
त्याची काय अवस्था होईल, ती ते पाहणार नव्हती.

दुर्योधन या व्यक्तिरेखेप्रति मी मला वाटलेले विचार मांडतोय. इथे खलनायक ठरलेल्या या व्यक्तिरेखेचा उदो उदो करण्याचा प्रयत्न करत नाही आहे, तर प्रत्येक माणसात काही न काही चांगले गुण पण असतात, पण बऱ्याचदा आपण काही जणांचे वाईट तेवढेच लक्षात ठेवतो, तर त्यांतील चांगल्या गुणांचा पण उहापोह व्हायला हवा यासाठी हा लेखनप्रपंच. कुणाला याप्रती मत मांडयचं असेल तर दुर्योधनाची याला मान्यता आहे. दुर्योधन : प्रत्येक कथेला एक नायक असतो आणि एक खलनायक. खलनायकाशिवाय नायकाची प्रतिमा उजळ होत नाही. महाभारताच पण तसच काहीस आहे. पांडवांची प्रतिमा उंचावण्यासाठी व्यासाने दुर्योधनाची प्रतिमा तेवढीच उठावदार बनवली आहे. त्याच्या पांडवान्प्रती दुष्कर्मांचे आणि कृत्यांचे असे काही प्रसंग त्याने निर्मिले कि एक जबरदस्त खलनायक या मिथकाला (?) मिळाला. पण जसा कुठलाही गुन्हेगार हा जन्मतः गुन्हेगार नसतो त्याला परिस्थिती तस बनवते. दुर्योधन पण त्याच परिस्थितीचा बळी होता. तो काही आईच्या पोटातुन वैर घेऊन नाही आला. तर तो बळी ठरला धृतराष्ट्राच्या राज्याप्रती असलेल्या आंतरिक इच्छांचा. पंडूच्या मृत्युनंतर तर त्याला कुरु राज्य आपलेच व आपल्या मुलांचे असेच वाटत होते, व सर्वात जेष्ठ असल्याकारणाने युवराजपद आपसुकच दुर्योधनाकडे जात होते व हेच बाळकडू त्याला लहानपणापासून मिळाले. त्या फुग्याला टाचणी लागली कुंतीच्या पांडवांबरोबर कुरुराज्यात परत येण्याने व राज्यावर अधिकार सांगण्याने. धृतराष्ट्र तोंडाने तर हेच बोलत होता कि पांडव त्याला सर्वात जास्त प्रिय आहेत, व हे राज्य त्याच्या जेष्ठ बंधू पंडूचेच आहे, पण मनोमन तो पांडवांचा भयंकर द्वेषच करत होता व हा द्वेषाग्नी त्याने दुर्योधानामध्ये सतत तेवत राहील याची काळजी घेतली. लहानपणापासून लाडात वाढलेलं मुल जसा हट्टी व स्वार्थी होत, तस दुर्योधनाच झालं. त्यात गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधल्याने तो संस्कारहीन पण झाला. तो कुणालाच जुमानेसा झाला. आणि पांडव तर त्याच्याप्रती उपरेच. त्यांचा अपमान करायची किंवा त्रास द्यायची एक संधी त्याने कधी सोडली नाही. तो माझे ऐकत नाही असे सांगून धृतराष्ट्राने हात झाडले, व गांधारी उपदेश करते म्हणून तो आईकडे जाणेच टाळू लागला. वडिलधाऱ्यांचा अपमान करण्यात त्याला काही चुकीचे वाटत नसे. भीष्माला, विदुराला व कृष्णाला वेळोवेळी त्याने बोल लावुन अपमानित केले आहे. पण काय एवढंच म्हणजे दुर्योधन काय? हे जे तो करत होत ते स्वाभाविक भितितुन, कि पांडव या राज्याचे राजे बनले तर कौरवांच भवितव्य काय. लहानपणापासून जे ऐश्वर्य भोगले आहे, त्याचा त्याग करावा लागणार व पांडवांचे आश्रित बनून राहावे लागणार. आणि यालाच त्याची मान्यता नव्हती व तयारी तर त्याहून नव्हती. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही, हि घोषणा त्याचेच द्योतक आहे. त्यातूनच पांडवांना संपवण्यासाठी त्याने लाक्षागृह, दयुत, अज्ञानवासात असताना हल्ला असले प्रसंग घडवून आणले. पांडवांना त्रास देण्याच्या नवीन नवीन कल्पना त्याच्या डोक्यात सतत तयार असत. पण याबरोबरच, दुर्योधन एक जबरदस्त मल्ल, गदायुद्धात प्रवीण व एक उत्तम सारथी पण होतां. तो एक प्रजाहितदक्ष राजा असल्याचा युधिष्ठिराने पण मान्य केले आहे. त्याचे जे काही वैर होते, ते फक्त पांडवांशीच व ते वैर त्याने अखेरपर्यंत पाळले. मैत्रीची त्याला चांगली जाण होती व तो कर्तुत्व पारखी पण होतां हे कर्णाला त्याने जागच्या जागी अंगदेशाचा राजा करून व शल्याला (पांडवांचा सख्खा मामा) युद्धात आपल्या बाजूला वळवून सिद्ध केले आहे. तो जर का एक चांगला राजा नसता तर महाभारत युद्धात एवढे राजे त्याला सामील झालेच नसते, हे पण मान्य करावेच लागते. पांडवानी पण दुर्योधनाला कमी लेखण्याची संधी कधी सोडली नाही. मयसभेत फसगत झाल्यावर 'आंधळ्याचा पुत्र आंधळा' हे द्रौपदीचे उद्गार त्याचेच द्योतक. आपण घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करत नाही, पण द्रौपदीने तेवढेही भान बाळगले नाही. याच अपमानाचा बदल त्याने मग पांडव दयुत हरल्यावर घेतला. त्याला काही द्रौपदीची अभिलाषा नव्हती किंवा तो वासनांध पण नव्हता, तर झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची एक संधी म्हणून त्याने तिला कुरुसभेत निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही त्याने कुणाचेच ऐकले नाही व हट्टाला पेटल्यासारखा तो पांडवांचा व भीष्मादी जेष्ठांचा अपमान करत कुरुसभेत ओरडत राहिला. युद्ध न करता पांडवांचा काटा काढता आला तर पाहावा म्हणून त्याने शकुनीच्या द्यूताच्या कल्पनेला मान्यता दिली व कर्णाला ते मान्य होणार नाही म्हणून त्याला दूर पण ठेवले. युद्ध करून पांडवांना हरवू हे कर्णाचे म्हणणे अखेर त्याने मान्य केले. व एकदा महाभारत युद्धाची घोषणा झाल्यावर मात्र आपल्याला दिसतो तो युद्धज्वर अंगी बाणवलेला दुर्योधनच. समोरची सेना बघून तो अर्जुनासारखा गलितगात्र झाला नाही. त्याले हेही माहित होत कि भीष्म, कृप, द्रोण या सर्वांच शरीर इथे आहे पण मन पांडवांकडे, पण तरीही तो त्यांना घेऊन लढला. स्वतःवर व कर्णाच्या पराक्रमावर त्याचा प्रचंड विश्वास होतां. तो एकदाच घाबरलेला दिसतो ते म्हणजे मरणाच्या भीतीने तळ्यात लपलेला असताना. पण तेव्हाही बाहेर आल्यानंतर तो प्राणपणानेच लढला आहे, ते पण कृष्णाने भीमाला सूचना केल्यामुळेच त्याला मृत्युं आला, अन्यथा तो भीमाला आवरत नव्हता. परंतु मरणपंथाला असतानाही जेव्हा त्याला कळले कि अश्वथाम्याने आपले वैर पुढे चालू ठेवले आहे तेव्हा त्या परिस्थितीतही त्याला अतीव आनंद लपवता आलेला नाही. क्षत्रियाचे मरण युद्धभूमीवर व्हावे असा संकेत आहे, तसेच वीराचे मरण त्याला आले आहे. तो भले एक दुष्कर्मा म्हणून जगला असेल, मरण मात्र त्याला विरोचित आले, ज्याला पांडव पण पारखे झाले. म्हणून दुर्योधनच खऱ्या अर्थाने महाभारत युद्धाचा नायक म्हणता येईल. त्याचा पांडवान्प्रतीचा असलेला आत्यंतिक द्वेषच या युद्धाचा कणा होतां, व तो द्वेष मनात बाळगूनच तो जगला व मरणही पावला.
सरकारचे डोके पुन्हा एकदा ठिकाणावर आहे काय ? कॉ. गोविंद पांसरेंच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास कोल्हापूर महापालिकेने ५ लाख व महाराष्ट्र सरकारने २५ लाखांचे इनाम जाहीर करण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवर व कोल्हापूर महापालिकेवर ओढवली आहे. शासन आणि सरकार अस्तित्वात आहे का? अशी परिस्थिती. डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे खुनी सापडले नाहीत तोवर अजुन एका कार्यकर्त्याचा अशा तऱ्हेने खून, म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावावर मारलेली चपराकच आहे. इनामाची वार्ता ऐकून शोले पिक्चरची आठवण झाली. गब्बरसिंगला पकडायला ठाकूर इनाम लावतो, आणि जय - विरु नावाचे गुंड त्याची सुपारी घॆउन गब्बरसिंगला ठाकूरच्या हवाली करतात. किती ढोबळ कथा, पण तिचे पडसाद अजुनही शासनाच्या अनास्थेने उमटतात. पैशाची लालूच दाखवली तर कोणीतरी काहीतरी माहिती देईल अशी सरकारी बाळबोध कल्पना. सरकारला हेच सांगायचं आहे बहुतेक कि, पैशाशिवाय कुठलही काम होत नाही. विचारवंत महाराष्ट्राचा लोप होऊन आता जंगलराज सुरु झाल्याची या दोन हत्या म्हणजे दारूण उदाहरण आहेत. बर दोन्ही हत्या झाल्यात त्या विशिष्ट कारणासाठी दोघे लढा देत होते तेव्हा झालेल्या आहेत, हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा जादूटोणा विरोधी बिल संसदेत पास व्हायचे होते. अनीसने जादूटोणा व बुवाबाजी विरोधात वातावरण समाजात तापवले होते. ठिकठिकाणी जाऊन समाजाला जागृत करण्याचे काम त्यांचे कार्यकर्ते जोमाने करत होते. आणि त्याच वेळेस डॉ ची हत्या झाली. कॉ पानसरे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या रस्ते टोल विरोधात आंदोलन करत होते व जन जागृती करत होते. कसलाही हिशेब नाही, कुणाचेही बंधन नाही, सरकारचा पर्यायाने लोकांचा पैसा टोल कंपन्यांच्या घशात घालण्याचा उद्योग या राज्यात वर्षानुवर्षे चालू आहे व त्याला कोणी आडकाठी केली तर सरकारही त्याला जुमानत नाही. असे बुवाबाजी व टोलधार्जिणे धोरण हे महाराष्ट्र सरकार राबवत आहे. या दोन विचारवंतांची हत्या करून समाजविघातक शक्तींना हाच संदेश द्यायचा आहे, कि जो कोणी आमच्या मनसुब्यांना विरोध करेल, आमच्या फायद्याच्या आड येईल त्याला असेच संपवण्यात येईल. व कुठलेही शासन व सरकार आमचे काहीच बिघडवू शकत नाही. व ज्याप्रकारे दीड वर्ष झाल्यावरसुद्धा दाभोळकरांचे मारेकरी अजुन सापडले नाही आहेत. त्यावरून समाजानेच आता काय समजायचं ते समजाव. माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कितितरी कार्यकर्त्यांवर जीव गमवायची व हल्ला करण्यात आल्याची उदाहरण घडली आहेत, पण अजुनही कोणावर ठोस कारवाई झाल्याचे पाहणीत नाही किंवा पुरेश्या पुराव्याअभावी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. शेवटी एवढंच म्हणायचं आहे कि, महाराष्ट्र आपला पुरोगामित्वाचा चेहेरा हरवत चालला आहे. विचारांची लढाई इथे आता हत्यारांनी जिंकली जाते. कॉ पांसरेंची प्राणज्योत मालवली तेव्हा सरकारला धारेवर धरण्याऐवजी आपण क्रिकेट वर्ल्डकपचे सामने बघण्यात मश्गुल होतो. अजुन दोन महिन्यांनी आय पी एल चे सामने सुरु होतील, मग तर काय बघायलाच नको. फक्त महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतवर्ष क्रिकेटगंगेत न्हाऊन निघेल. समाजविघातक शक्तींना पोषक वातावरण तयार आहे या महाराष्ट्रात. आपण क्रिकेट सामने बघण्यात मश्गुल आणि ते त्यांचा कार्यभाग उरकण्यात. // जय हिंद, जय महाराष्ट्र //

Tuesday, 24 February 2015

तु कुठे जाशील तिथे मी तुझ्याबरोबर आहे, एकट नको समजु, मी कायम तुझ्याबरोबर आहे. जन्म घेतल्यास जिच्या पोटी, ती तुझी माता मीच झालो, पडल्यावर तुला आधार देण्यासाठी, तुझा बाप पण मीच झालो, लहान तुला चालणं शिकवण्यासाठी, मी तुझा पांगुळगाडा झालो, तुझी बडबडगीते ऐकण्यासाठी, तुझे आजी आजोबा मीच झालो, शाळेमध्ये संस्कार शिकविण्यास, शिक्षक पण मीच झालो, तु निघाला मुशाफिरीला, ज्ञानवाटा शोधायला, मी तुझी पाऊलवाट झालो, तु उभा राहिलास थकुन, मी तुझ्यासाठी सावली झालो, तहानलेल्या तुझ्या जीवासाठी, थंड पाण्याची विहीर झालो, आग पडली पोटात तेव्हा, द्रौपदीची थाळी पण मीच झालो, तु मेहनतीने कमावलेल्या संपत्तीचा, कुबेर पण मीच झालो, अहंकारीत मनाचा निःपात करणारा, द्वारकाधीश कृष्ण पण मीच झालो, आणि तुला अनंतात विलिन करणारा, अग्नी पण मीच झालो. // श्री कृष्णार्पणमस्तू //
प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असत.
फक्त बाह्य सौंदर्याच आकर्षण म्हणजे प्रेम कि,
अंतर्मनाची हाक म्हणजे प्रेम,
एकमेकांची ओढ म्हणजे प्रेम कि,
एकमेकांबद्दल काळजी म्हणजे प्रेम,
वाट बघणं म्हणजे प्रेम कि,
आपल समजुन पुढे जाण म्हणजे प्रेम,
हक्काने काही करून घेणं म्हणजे प्रेम कि,
त्रास होऊ नये म्हणुन स्वतःच खपण  म्हणजे प्रेम,
मनातलं सर्व सांगणं म्हणजे प्रेम कि,
दुसऱ्याच्या मनाचा पण विचार करणं म्हणजे प्रेम,
हातात हात घालुन आयुष्य जगणं म्हणजे प्रेम कि,
तिच्या / त्याच्या प्रगतीत आपल अडथळा होऊ नये,
म्हणुन निष्ठुरपणे दुर जाणे म्हणजे प्रेम,
न विसरणे म्हणजे प्रेम कि,
विसरता न येणे म्हणजे प्रेम,
एकटेपणाची जाणीव ज्याच्या नसण्याने होते ते प्रेम कि,
ज्याच्या आठवणीने एकटेपणा दुरावतो ते प्रेम.
कुठल्याही व्याख्येत याला बसवता येत नाही,
कुठल्याही कोंदणात याला ठसवता येत नाही,
कोण कशाला प्रेम म्हणेल काही नेम नाही,
म्हणुन तुमच आणि आमचं प्रेम सेम नाही.

Sunday, 22 February 2015

तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.

अस्तित्व हे तुझे, मन मोहरून टाके,
ते मुक्त केस तुझे, पाहुनी रात्र दाटे,
त्या कुरळ्या बटांत हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.

हसणे तुझे कुंदकळ्यांची आरास वाटे,
रुसणे तुझे अत्तराचा मंद सुवास वाटे,
त्या क्षणांचा सोबती होऊ दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.

काय सांगु तुला काय वाटे मला ते,
तुझ्या रुसण्याने उदासीचे धुके दाटे ते,
त्या धुक्यामध्ये हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.

Sunday, 8 February 2015

बडी मुद्दत के बाद, कलम ली है हाथ मे,
शायद ही कुछ लिख पाउंगा,
पर इतना यकीन है खुद पे,
अपने पे उतर आऊ तो,
फिरसे शाम ए गजल कर दुंगा.