Tuesday, 24 February 2015

तु कुठे जाशील तिथे मी तुझ्याबरोबर आहे, एकट नको समजु, मी कायम तुझ्याबरोबर आहे. जन्म घेतल्यास जिच्या पोटी, ती तुझी माता मीच झालो, पडल्यावर तुला आधार देण्यासाठी, तुझा बाप पण मीच झालो, लहान तुला चालणं शिकवण्यासाठी, मी तुझा पांगुळगाडा झालो, तुझी बडबडगीते ऐकण्यासाठी, तुझे आजी आजोबा मीच झालो, शाळेमध्ये संस्कार शिकविण्यास, शिक्षक पण मीच झालो, तु निघाला मुशाफिरीला, ज्ञानवाटा शोधायला, मी तुझी पाऊलवाट झालो, तु उभा राहिलास थकुन, मी तुझ्यासाठी सावली झालो, तहानलेल्या तुझ्या जीवासाठी, थंड पाण्याची विहीर झालो, आग पडली पोटात तेव्हा, द्रौपदीची थाळी पण मीच झालो, तु मेहनतीने कमावलेल्या संपत्तीचा, कुबेर पण मीच झालो, अहंकारीत मनाचा निःपात करणारा, द्वारकाधीश कृष्ण पण मीच झालो, आणि तुला अनंतात विलिन करणारा, अग्नी पण मीच झालो. // श्री कृष्णार्पणमस्तू //

No comments:

Post a Comment