शेतकऱ्यांच्या राज्यात, शेतकरीच झाला त्रस्त,
काळी माय गहाण ठेऊन, झाला धरणिग्रस्त.
आणि काय म्हणता तुम्ही राव, गर्जा गर्जा महाराष्ट्र.
हवालदिल जनता आणि नोकरशाही भ्रष्ट,
खिशामध्ये माल असेल, तरच काम मस्त,
तरी पण म्हणता तुम्ही, गर्जा गर्जा महाराष्ट्र.
समाजकारणाच्या नावाखाली राजकारणी धष्टपुष्ट,
विकासाचे लोणी यांनी कधीच केले फस्त,
बोंबलत बसा तुम्ही मग, गर्जा गर्जा महाराष्ट्र.
बिल्डरांना चाप नही, जंगले झाली नष्ट,
कितीही तक्रार करा तुम्ही, कायदा प्रशासन सुस्त,
आणि तुम्ही आम्हाला सांगा, कि गर्जा गर्जा महाराष्ट्र.
फुले-आंबेडकरांची नावे घेता, पण नाही कोणालाच शिस्त,
सवलतींच्या बाण्डगुळावर अजून यांची भिस्त,
आणि कस काय सांगता तुम्ही कि, गर्जा गर्जा महाराष्ट्र.
सुधारकांच्या या महाराष्ट्राला, लागली कोणाची दृष्ट,
चला उठुया, साफ करूया समाजाचे हे कुष्ठ,
आता म्हणा ना तुम्ही पण, गर्जा गर्जा महाराष्ट्र .
No comments:
Post a Comment