नेहमीच तशी ती बरोबर असते,
मनामध्ये ती कायमच वसते,
पण कधीतरीच तिच्यातली "ती" भेटते.
बघावं तेव्हा ती घाईतच असते,
कधीतरीच, सायंकाळच्या सावलीसारखी विसावलेली भासते,
पण जेव्हा भेटते तेव्हा मात्र, जीवन व्यापून टाकते.
तिची भेट म्हणजे एक पर्वणी असते,
भरभरून बोलते, खळखळून हसते,
मनात असेल ते सर्व सांगून टाकते.
हसता हसता भांडते, आणि भांडताना लगेच हसते पण.
रुसणं पण तीच मजेदार असत,
मनातलं हसू चेहेऱ्यावर दिसत.
ती म्हणजे, मोकळा श्वास असते,
ती म्हणजे, मन प्रफुल्ल करणारा सहवास असते,
ती म्हणजे, धुंद मोगरीचा सुवास असते,
आणि चमचमत्या ताऱ्यांची बरसात पण तीच असते.
अशी ती फार कमी वेळा भेटते,
जाताना आठवणी मात्र खूप देऊन जाते.
मनावर तिच्या ताजेपणाची मोहोर उमटवून जाते,
पण हे तेव्हाच शक्य होत,
जेव्हा ती "तिला" घेऊन येते,
जेव्हा ती "तिला" घेऊन येते.
No comments:
Post a Comment