Monday, 23 March 2015

जातीभेद अमंगळ,
होतसे दुष्टांची चंगळ,
असत्याची ती दंगल,
सर्वार्थी //1//
या शतकामीशी,
त्वा जातीभेद पाळीशी,
बुध्दी गहाण ठेविशी,
काय कि जे //2//
देवाने सर्वां निर्मिले,
भेदाभेद नाही पाळिले,
तुम्ही काय म्हणोनी सर्वां छळिले,
कैसे हे कर्म //3//
या सुजलाम भुमीवरी,
सर्व प्राणिमात्र एकसरी,
एकोप्याने संसार करी,
जी सी म्हणे //4//

No comments:

Post a Comment