Friday, 27 February 2015

तिला रोखल नाही त्याने, कारण
थांब म्हंटलं तरी ती थांबणार नव्हती,
त्याची काय अवस्था होईल, ती ते पाहणार नव्हती.
फार दिवसांची मैत्री नव्हती त्यांची,
पण  मैत्री कुठल्या मापाने मोजायची,
ती भेटल्यास दिवस चांगले गेले,
हसणे, रुसणे, चिडणे सर्व  अनुभवले,
पण कशातच ती जास्त रमायची नाही,
नक्की कशात गोडी आहे तिला,
पटकन कधी कळायचंच नाही,
तिच्याबाबतीत तो जर हळवा होता,
तिला आनंदी बघण्यासाठी झटणारा होता,
ती  थोडं अंतर ठेऊनच असायची,
तो वहावयाचा, ती मात्र नेहमीच भानावर असायची.
हळुहळू मैत्रीत मर्यादा यायला लागली,
त्याने तीच ऐकायचं, ती मात्र आपल तेच खर करायला लागली,
तो कितीही चिडला तरी, तीचा शब्द कधी मोडायचा नाही,
तिला आठवत नसलेल्या गोष्टी, तो मात्र कधीच विसरायचा नाही,
तीचा मूड सांभाळायचा कसोशीने प्रयत्न करायचा,
पण आजकाल तीचा मूड कशानेही बिघादायाचा,
तिने मग त्याला टाळायला सुरुवात केली, भेटणं तर दुर्लभ,
काहीबाही कारण सांगुन बोलेनाशी झाली,
एक दिवस म्हणाली, भेटायला ये,
भेटली आणि फक्त गप्प बसून राहिली,
काय चाललंय मनात कळत नव्हत,
आज तिला छेडायच नाही, त्याने पण ठरवलं होत,
जाताना एवढंच म्हणाली, जाते, परत भेटणार नाही,
त्याने पण तिला जाऊ दिला, कारण विचारलं नाही,
कारण, थांब म्हंटलं तरी ती थांबणार नव्हती,
त्याची काय अवस्था होईल, ती ते पाहणार नव्हती.

No comments:

Post a Comment