तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
अस्तित्व हे तुझे, मन मोहरून टाके,
ते मुक्त केस तुझे, पाहुनी रात्र दाटे,
त्या कुरळ्या बटांत हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
हसणे तुझे कुंदकळ्यांची आरास वाटे,
रुसणे तुझे अत्तराचा मंद सुवास वाटे,
त्या क्षणांचा सोबती होऊ दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
काय सांगु तुला काय वाटे मला ते,
तुझ्या रुसण्याने उदासीचे धुके दाटे ते,
त्या धुक्यामध्ये हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
अस्तित्व हे तुझे, मन मोहरून टाके,
ते मुक्त केस तुझे, पाहुनी रात्र दाटे,
त्या कुरळ्या बटांत हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
हसणे तुझे कुंदकळ्यांची आरास वाटे,
रुसणे तुझे अत्तराचा मंद सुवास वाटे,
त्या क्षणांचा सोबती होऊ दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
काय सांगु तुला काय वाटे मला ते,
तुझ्या रुसण्याने उदासीचे धुके दाटे ते,
त्या धुक्यामध्ये हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
No comments:
Post a Comment