जीवनाच्या संध्याकाळी तरी भेटशील का सांग,
मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग.
दिवसा मागून दिवस हे सरले,
तुझ्या आठवणीशीवाय हाती काही न उरले,
त्या आठवणीना उजाळा देशील का सांग,
मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग.
तुला पाहिले तुझाच होऊन गेलो,
कळलेच नाही कधी वाहवत गेलो,
तू पण संगे येशील का सांग,
मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग.
तुझ्या मनाचा थांग कधी लागलाच नाही,
पण कधी तू निराश पण केले नाही,
आता तरी मन उघड करशील का सांग,
मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग.
जगण्याची उमेदही संपून गेली,
येशील तू कधी, आसहि नुरली,
सरणावर तरी दोन अश्रू ढाळशिल का सांग,
मनाच्या गाभाऱ्यात दिवा लावशील का सांग.
No comments:
Post a Comment