जीवनात असे ही काही मैत्र भेटतात,
जे एकाच कारणासाठी, वेगवेगळ्या तऱ्हेने वागतात.
पण, फक्त सहन करणं असत आपल्या हातात,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.
अस का केलत म्हणुन त्यांना विचारायचं नसत,
तिऱ्हाइताप्रमाणे फक्त पहायचं असत,
अशावेळी त्यांच्या वागण्यावर आपणच पांघरूण घालायची असतात,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.
कधी कधी उबग येतो अशा वागण्याचा,
राग येतो, पण अधिकार नसतो आपल्याला रागावण्याचा,
ते मात्र आपल्याच निर्णयावर खुश असतात,
पण काय करणार,
कारण ते आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात.
विश्वास ठेवावा, त्याचा वेगळाच चेहेरा समोर येतो,
कोणाच्या खांद्यावर हात ठेवावा, असा मग प्रश्न पडतो,
अनुभवाने कळलय की, अश्या प्रश्नांची उत्तर शोधायची नसतात,

No comments:
Post a Comment