Tuesday, 24 February 2015

प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असत.
फक्त बाह्य सौंदर्याच आकर्षण म्हणजे प्रेम कि,
अंतर्मनाची हाक म्हणजे प्रेम,
एकमेकांची ओढ म्हणजे प्रेम कि,
एकमेकांबद्दल काळजी म्हणजे प्रेम,
वाट बघणं म्हणजे प्रेम कि,
आपल समजुन पुढे जाण म्हणजे प्रेम,
हक्काने काही करून घेणं म्हणजे प्रेम कि,
त्रास होऊ नये म्हणुन स्वतःच खपण  म्हणजे प्रेम,
मनातलं सर्व सांगणं म्हणजे प्रेम कि,
दुसऱ्याच्या मनाचा पण विचार करणं म्हणजे प्रेम,
हातात हात घालुन आयुष्य जगणं म्हणजे प्रेम कि,
तिच्या / त्याच्या प्रगतीत आपल अडथळा होऊ नये,
म्हणुन निष्ठुरपणे दुर जाणे म्हणजे प्रेम,
न विसरणे म्हणजे प्रेम कि,
विसरता न येणे म्हणजे प्रेम,
एकटेपणाची जाणीव ज्याच्या नसण्याने होते ते प्रेम कि,
ज्याच्या आठवणीने एकटेपणा दुरावतो ते प्रेम.
कुठल्याही व्याख्येत याला बसवता येत नाही,
कुठल्याही कोंदणात याला ठसवता येत नाही,
कोण कशाला प्रेम म्हणेल काही नेम नाही,
म्हणुन तुमच आणि आमचं प्रेम सेम नाही.

No comments:

Post a Comment