सरकारचे डोके पुन्हा एकदा ठिकाणावर आहे काय ?
कॉ. गोविंद पांसरेंच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास कोल्हापूर महापालिकेने ५ लाख व महाराष्ट्र सरकारने २५ लाखांचे इनाम जाहीर करण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवर व कोल्हापूर महापालिकेवर ओढवली आहे. शासन आणि सरकार अस्तित्वात आहे का? अशी परिस्थिती. डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे खुनी सापडले नाहीत तोवर अजुन एका कार्यकर्त्याचा अशा तऱ्हेने खून, म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावावर मारलेली चपराकच आहे. इनामाची वार्ता ऐकून शोले पिक्चरची आठवण झाली. गब्बरसिंगला पकडायला ठाकूर इनाम लावतो, आणि जय - विरु नावाचे गुंड त्याची सुपारी घॆउन गब्बरसिंगला ठाकूरच्या हवाली करतात. किती ढोबळ कथा, पण तिचे पडसाद अजुनही शासनाच्या अनास्थेने उमटतात. पैशाची लालूच दाखवली तर कोणीतरी काहीतरी माहिती देईल अशी सरकारी बाळबोध कल्पना. सरकारला हेच सांगायचं आहे बहुतेक कि, पैशाशिवाय कुठलही काम होत नाही.
विचारवंत महाराष्ट्राचा लोप होऊन आता जंगलराज सुरु झाल्याची या दोन हत्या म्हणजे दारूण उदाहरण आहेत. बर दोन्ही हत्या झाल्यात त्या विशिष्ट कारणासाठी दोघे लढा देत होते तेव्हा झालेल्या आहेत, हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा जादूटोणा विरोधी बिल संसदेत पास व्हायचे होते. अनीसने जादूटोणा व बुवाबाजी विरोधात वातावरण समाजात तापवले होते. ठिकठिकाणी जाऊन समाजाला जागृत करण्याचे काम त्यांचे कार्यकर्ते जोमाने करत होते. आणि त्याच वेळेस डॉ ची हत्या झाली. कॉ पानसरे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या रस्ते टोल विरोधात आंदोलन करत होते व जन जागृती करत होते. कसलाही हिशेब नाही, कुणाचेही बंधन नाही, सरकारचा पर्यायाने लोकांचा पैसा टोल कंपन्यांच्या घशात घालण्याचा उद्योग या राज्यात वर्षानुवर्षे चालू आहे व त्याला कोणी आडकाठी केली तर सरकारही त्याला जुमानत नाही. असे बुवाबाजी व टोलधार्जिणे धोरण हे महाराष्ट्र सरकार राबवत आहे.
या दोन विचारवंतांची हत्या करून समाजविघातक शक्तींना हाच संदेश द्यायचा आहे, कि जो कोणी आमच्या मनसुब्यांना विरोध करेल, आमच्या फायद्याच्या आड येईल त्याला असेच संपवण्यात येईल. व कुठलेही शासन व सरकार आमचे काहीच बिघडवू शकत नाही. व ज्याप्रकारे दीड वर्ष झाल्यावरसुद्धा दाभोळकरांचे मारेकरी अजुन सापडले नाही आहेत. त्यावरून समाजानेच आता काय समजायचं ते समजाव. माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कितितरी कार्यकर्त्यांवर जीव गमवायची व हल्ला करण्यात आल्याची उदाहरण घडली आहेत, पण अजुनही कोणावर ठोस कारवाई झाल्याचे पाहणीत नाही किंवा पुरेश्या पुराव्याअभावी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.
शेवटी एवढंच म्हणायचं आहे कि, महाराष्ट्र आपला पुरोगामित्वाचा चेहेरा हरवत चालला आहे. विचारांची लढाई इथे आता हत्यारांनी जिंकली जाते. कॉ पांसरेंची प्राणज्योत मालवली तेव्हा सरकारला धारेवर धरण्याऐवजी आपण क्रिकेट वर्ल्डकपचे सामने बघण्यात मश्गुल होतो. अजुन दोन महिन्यांनी आय पी एल चे सामने सुरु होतील, मग तर काय बघायलाच नको. फक्त महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतवर्ष क्रिकेटगंगेत न्हाऊन निघेल. समाजविघातक शक्तींना पोषक वातावरण तयार आहे या महाराष्ट्रात. आपण क्रिकेट सामने बघण्यात मश्गुल आणि ते त्यांचा कार्यभाग उरकण्यात.
// जय हिंद, जय महाराष्ट्र //
Friday, 27 February 2015
Tuesday, 24 February 2015
तु कुठे जाशील तिथे मी तुझ्याबरोबर आहे,
एकट नको समजु, मी कायम तुझ्याबरोबर आहे.
जन्म घेतल्यास जिच्या पोटी,
ती तुझी माता मीच झालो,
पडल्यावर तुला आधार देण्यासाठी,
तुझा बाप पण मीच झालो,
लहान तुला चालणं शिकवण्यासाठी,
मी तुझा पांगुळगाडा झालो,
तुझी बडबडगीते ऐकण्यासाठी,
तुझे आजी आजोबा मीच झालो,
शाळेमध्ये संस्कार शिकविण्यास,
शिक्षक पण मीच झालो,
तु निघाला मुशाफिरीला,
ज्ञानवाटा शोधायला,
मी तुझी पाऊलवाट झालो,
तु उभा राहिलास थकुन,
मी तुझ्यासाठी सावली झालो,
तहानलेल्या तुझ्या जीवासाठी,
थंड पाण्याची विहीर झालो,
आग पडली पोटात तेव्हा,
द्रौपदीची थाळी पण मीच झालो,
तु मेहनतीने कमावलेल्या संपत्तीचा,
कुबेर पण मीच झालो,
अहंकारीत मनाचा निःपात करणारा,
द्वारकाधीश कृष्ण पण मीच झालो,
आणि तुला अनंतात विलिन करणारा,
अग्नी पण मीच झालो.
// श्री कृष्णार्पणमस्तू //
प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असत.
फक्त बाह्य सौंदर्याच आकर्षण म्हणजे प्रेम कि,
अंतर्मनाची हाक म्हणजे प्रेम,
एकमेकांची ओढ म्हणजे प्रेम कि,
एकमेकांबद्दल काळजी म्हणजे प्रेम,
वाट बघणं म्हणजे प्रेम कि,
आपल समजुन पुढे जाण म्हणजे प्रेम,
हक्काने काही करून घेणं म्हणजे प्रेम कि,
त्रास होऊ नये म्हणुन स्वतःच खपण म्हणजे प्रेम,
मनातलं सर्व सांगणं म्हणजे प्रेम कि,
दुसऱ्याच्या मनाचा पण विचार करणं म्हणजे प्रेम,
हातात हात घालुन आयुष्य जगणं म्हणजे प्रेम कि,
तिच्या / त्याच्या प्रगतीत आपल अडथळा होऊ नये,
म्हणुन निष्ठुरपणे दुर जाणे म्हणजे प्रेम,
न विसरणे म्हणजे प्रेम कि,
विसरता न येणे म्हणजे प्रेम,
एकटेपणाची जाणीव ज्याच्या नसण्याने होते ते प्रेम कि,
ज्याच्या आठवणीने एकटेपणा दुरावतो ते प्रेम.
कुठल्याही व्याख्येत याला बसवता येत नाही,
कुठल्याही कोंदणात याला ठसवता येत नाही,
कोण कशाला प्रेम म्हणेल काही नेम नाही,
म्हणुन तुमच आणि आमचं प्रेम सेम नाही.
फक्त बाह्य सौंदर्याच आकर्षण म्हणजे प्रेम कि,
अंतर्मनाची हाक म्हणजे प्रेम,
एकमेकांची ओढ म्हणजे प्रेम कि,
एकमेकांबद्दल काळजी म्हणजे प्रेम,
वाट बघणं म्हणजे प्रेम कि,
आपल समजुन पुढे जाण म्हणजे प्रेम,
हक्काने काही करून घेणं म्हणजे प्रेम कि,
त्रास होऊ नये म्हणुन स्वतःच खपण म्हणजे प्रेम,
मनातलं सर्व सांगणं म्हणजे प्रेम कि,
दुसऱ्याच्या मनाचा पण विचार करणं म्हणजे प्रेम,
हातात हात घालुन आयुष्य जगणं म्हणजे प्रेम कि,
तिच्या / त्याच्या प्रगतीत आपल अडथळा होऊ नये,
म्हणुन निष्ठुरपणे दुर जाणे म्हणजे प्रेम,
न विसरणे म्हणजे प्रेम कि,
विसरता न येणे म्हणजे प्रेम,
एकटेपणाची जाणीव ज्याच्या नसण्याने होते ते प्रेम कि,
ज्याच्या आठवणीने एकटेपणा दुरावतो ते प्रेम.
कुठल्याही व्याख्येत याला बसवता येत नाही,
कुठल्याही कोंदणात याला ठसवता येत नाही,
कोण कशाला प्रेम म्हणेल काही नेम नाही,
म्हणुन तुमच आणि आमचं प्रेम सेम नाही.
Sunday, 22 February 2015
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
अस्तित्व हे तुझे, मन मोहरून टाके,
ते मुक्त केस तुझे, पाहुनी रात्र दाटे,
त्या कुरळ्या बटांत हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
हसणे तुझे कुंदकळ्यांची आरास वाटे,
रुसणे तुझे अत्तराचा मंद सुवास वाटे,
त्या क्षणांचा सोबती होऊ दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
काय सांगु तुला काय वाटे मला ते,
तुझ्या रुसण्याने उदासीचे धुके दाटे ते,
त्या धुक्यामध्ये हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
अस्तित्व हे तुझे, मन मोहरून टाके,
ते मुक्त केस तुझे, पाहुनी रात्र दाटे,
त्या कुरळ्या बटांत हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
हसणे तुझे कुंदकळ्यांची आरास वाटे,
रुसणे तुझे अत्तराचा मंद सुवास वाटे,
त्या क्षणांचा सोबती होऊ दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला.
काय सांगु तुला काय वाटे मला ते,
तुझ्या रुसण्याने उदासीचे धुके दाटे ते,
त्या धुक्यामध्ये हरवु दे मला,
तुझ्या असण्याने काय होते,
ते तुझ्या नसण्याने समजले मला,
काळीज पोखरणे म्हणजे काय,
ते तुझ्या रुसव्याने समजले मला.
Sunday, 8 February 2015
तुझसे प्यार करू या ना करू,
ये सवाल कभी था ही नही दिल मे,
जब भी तुम्हे देखा है,
प्यार से ही देखा है.
तु कहे तो जान भी दु मैं,
पर दिल कैसे दु,
जिसपे मेरा भी बस नही रहा,
उसे मैं किसी और को कैसे दु.
तुझसे मिलनेकी दरकार नही मुझे,
तेरी आवाजसे भी काम बनता है मेरा,
तुझे देखना तो दिल ए हसरत है पर,
तेरी तसवीर से भी वक़्त कटता है मेरा.
ये सवाल कभी था ही नही दिल मे,
जब भी तुम्हे देखा है,
प्यार से ही देखा है.
तु कहे तो जान भी दु मैं,
पर दिल कैसे दु,
जिसपे मेरा भी बस नही रहा,
उसे मैं किसी और को कैसे दु.
तुझसे मिलनेकी दरकार नही मुझे,
तेरी आवाजसे भी काम बनता है मेरा,
तुझे देखना तो दिल ए हसरत है पर,
तेरी तसवीर से भी वक़्त कटता है मेरा.
Tuesday, 3 February 2015
तुला पटेल ते तु कर, आणि मला हवे ते मला करू देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुझी प्रतिमा जपली आहे मी,
नसेल तुझ्या मनात माझी प्रतिमा, तर नसु देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.
एकाच नाण्याच्या दोन बजु असलो,
तरी विचारांची फारकत असु शकते कि, आणि असु देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुझी प्रतिमा जपली आहे मी,
नसेल तुझ्या मनात माझी प्रतिमा, तर नसु देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.
एकाच नाण्याच्या दोन बजु असलो,
तरी विचारांची फारकत असु शकते कि, आणि असु देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.
मी काही तुझ्यावर नाही रागावलो मित्रा,
मला माझीच शरम आली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.
मला वाटल मी शब्दांचा सोहळा करतोय,
मग कशी काय त्या शब्दांना धार आली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.
सगळे म्हणतात म्हणजे असेनही मी वेडा,
पण ती वैचारिक दिवाळखोरी माझ्या नशिबी का आली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.
बौद्धिक शहाणपण हा कधीच माझा विषय नव्हता,
पण सारासार विचारबुद्धी पण कशी ना चाले झाली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.
मित्रांवर पण आपला हक्क नसतो हे आज कळलं मला,
मैत्र मानलं त्यांचीच खप्पा मर्जी झाली, नी
मैत्रीच्या नात्याचीच ऐशीतैशी झाली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.
इतर कुणाला कशाला दोष देऊ, मीच माझ्या दोषांचा धनी,
मैत्रीची पण एक आचारसंहिता असते, तीच माझ्या लक्षात नाही आली,
आणि आता वेळ गेल्यावर विचार करून काय उपयोग कि,
साली अशी कशी प्रतिमा झाली.
विश्वास कुठे पाहीला का हो?
हरवलाय कुठे कळत नाही,
स्वार्थाच्या या दुनियेत,
शोधुनही सापडत नाही.
मैत्रीत पुर्वी दिसायचा,
आता तिथेही तो भेटत नाही,
इथेही त्याच आता म्हणे,
पुर्वीसारख मन रमत नाही.
काहीतरी चुकलय म्हणतो,
आता कोण कोणाच राहिल नाही,
संशयाने घर जिथे घेतलं,
तिथे विश्वासाला थारा नाही.
आज त्याची गरज भासली,
म्हणुन शोधायला गेलो तर,
हरवलाय कुठे कळत नाही,
स्वार्थाच्या या दुनियेत,
शोधुनही तो सापडत नाही.
Monday, 2 February 2015
Wednesday, 21 January 2015
भारत स्वच्छता अभियान :
आज सकाळी ऑफिस इमारतीजवळ एक रेली पाहिली. हिंदुस्तान पेट्रोलिअम कंपनीचे कर्मचारी भारत स्वच्छ अभियानाच्या घोषणा देत होते. हातात घोषणा फलक होते आणि सर्वांच्या डोक्यावर एकाच रंगाच्या (पिवळ्या) टोप्या होत्या. काही जणांच्या हातात झाडु होते आणि ते लोक उभ्या उभ्या जराही कमरेत न वाकता रस्त्यावरचा (कफ परेडच्या ) नसलेला कचरा साफ करायचा देखावा करत होते. आणि त्यांच्या पुढे एक छायाचित्रकार हे सर्व नाटक चित्रबद्ध करत होता. आता तुम्हीच सांगा मित्रहो, अशा ठिकाणी कचरा सफाईची अभियान राबवुन यांना काय उद्देश साधायचा आहे. करायचंच असेल तर नालेसफाई करा कि. दरवर्षी पावसाळ्यात याच नाल्यांमुळे रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे प्रकार घडतात. पण त्याकडे पुर्ण दुर्लक्ष करून आजकाल लोक भारत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत समाजातील विशिष्ट घटकांना खुश करायचीच योजना राबवत आहेत की काय अशी शंका येते. बर यांची ही जी काही तथाकथित रेली होती, ती पण कामाच्या वेळेत, म्हणजे स्वतःच्या पदरचा वेळही खर्च न करता यांना ही अशी कृती कशी करू दिली जाते, याचा अभ्यास व्हायला हवा. सरकारी पातळीवर अशा योजना म्हणजे काम न करता करमणुक करण्याचा मुक्त परवानाच जणु.
मुळात स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम देशात राबवण्याची पाळी येणे हीच मुळात लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा एक जनसामान्य म्हणुन आपण कधी विचार करणार? मला रस्त्यात कचरा करायचा नाही किंवा मला रस्त्यात थुंकायचं नाही हे सांगायची किंवा त्यासाठी दंड करायची वेळ सरकारवर का यावी? याचा आपण विचार कधी करणार आहोत. कुठल्याही देशाच्या सरकारपुढे अनेक आव्हान, उद्दिष्टे असतात. स्वच्छता अभियानासारखं उद्दिष्ट कुठल्याही सरकारच असुच शकत नही. ही जबाबदारी त्या देशातल्या सुजाण नागरिकांची असते. पहिले स्वतःला, मग घराला, मग परिसराला स्वच्छ ठेवणे हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाच असल पाहिजे. ते जर असेल तरच आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत असे आपण म्हणु शकतो.
आजकाल बरीच मंडळी विविध कारणांनी परदेशगमन करून येतात व परदेशातल्या स्वच्छतेच आणि तिथल्या नागरिकांच्या साफसुथरे राहण्याचं तोंड फुटेस्तोवर कौतुक करतात आणि आपल्या देशातील घाणीच्या साम्राज्याला नावे ठेवतात. ही मंडळी हे नेमकेपणाने विसरतात की या साम्राज्यवाढीला आपलाही हातभार लागलेला आहे. परदेशात असताना तिथले नियम पाळणारी ही शहाजोग मंडळी आपल्या देशात आली की सगळे नियम बासनात गुंडाळुन कचरा करायला तयार असतात. फक्त इंग्रज माणसाचं कौतुक करून आणि त्याची भाषा शिकुन आपण सुजाण बनलो का? याचा विचार व्हायला हवा. त्याची नियम पाळण्याची सवय आपण आपल्या अंगी जडवुन घ्यायला हवी. मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़ल उचलणार नाहीं हे बाणेदार उत्तर झालं, पण देश तेव्हाच स्वच्छ होईल जेव्हा आपण गांधी विचार अंगी बाणवुन दुसर्याची टरफ़ल पण उचलायला सिद्ध होऊ, आणि तेव्हा आणि तरच आपल्या सरकारला हे असले फुटकळ अभियान राबविण्याची गरज भासणार नाहीं, अस मला वाटतं.
एक शाम ढलती हुई :
कभी देखा है तुमने शाम ढलते हुए,
आसमाको अपना रंग बदलते हुए,
पंछीओंको घर लौटते हुए,
एक उदासी भरा माहौल होता है.
मैने भी देखा है उसे,
मेरे दिल में अंधेरा करके,
अपने घर लौटते हुए,
रुकते हुए पैरोको खिंचते हुए,
दुर दुर तक मुझपे निगाहे जमाके,
मेरी तकदीर को मुझसे दुर ले जाते हुए,
उसके चेहरेका नुर भी,
आसमाके रंग की तरह बदल रहा था,
आखोसें बरसते अश्कोंसे,
उसका गुलाबी चेहेरा गिला हो रहा था.
कहना था बहुत कुछ,
मगर जुबापे आनेसे कतरा रहा था.
मैं तो अमावस के चांद की तरह,
अपने आप को महसुस कर रहा था.
आसमामे होते हुए भी,
ना दिखनेकी कोशिश कर रहा था.
ये जानते हुए वो शाम अब फिर ना आयेगी,
एक जो आसमामे ढल रही थी,
एक मेरे दिलमे अंधेरा कर रही थी,
हमेशा के लिये.
कभी देखा है तुमने शाम ढलते हुए,
आसमाको अपना रंग बदलते हुए,
पंछीओंको घर लौटते हुए,
एक उदासी भरा माहौल होता है.
मैने भी देखा है उसे,
मेरे दिल में अंधेरा करके,
अपने घर लौटते हुए,
रुकते हुए पैरोको खिंचते हुए,
दुर दुर तक मुझपे निगाहे जमाके,
मेरी तकदीर को मुझसे दुर ले जाते हुए,
उसके चेहरेका नुर भी,
आसमाके रंग की तरह बदल रहा था,
आखोसें बरसते अश्कोंसे,
उसका गुलाबी चेहेरा गिला हो रहा था.
कहना था बहुत कुछ,
मगर जुबापे आनेसे कतरा रहा था.
मैं तो अमावस के चांद की तरह,
अपने आप को महसुस कर रहा था.
आसमामे होते हुए भी,
ना दिखनेकी कोशिश कर रहा था.
ये जानते हुए वो शाम अब फिर ना आयेगी,
एक जो आसमामे ढल रही थी,
एक मेरे दिलमे अंधेरा कर रही थी,
हमेशा के लिये.
Tuesday, 20 January 2015
जो जी मे आए कहले मुझे,
मेरी नियत पे ना शक करना कभी,
मै युही मर जाऊंगा तु कहे तो,
मेरे प्यार का इम्तहान ना लेना कभी
एक अनकही सच्चाई है मौत,
फिर क्यो मरनेसे डरते है लोग,
जिंदगी तो बस एक पहेली है,
फिर भी जिने के लिये क्यो मरते है लोग.
रेत की दिवार से घर नही बनते,
टूटी हुई नाव से किनारे नही मिलते,
दोस्त बिगडा है तो क्या हुआ, उसे मनाओ,
कहदो साले, तेरे बगैर मेरे दिन नही कटते.
सुना था दोस्तीकी ना जमी होती है ना आसमां,
पर तुमसे मिलके, उसकी हदोको जान गया मै,
सवाल ये था की, क्या मेरी आह गलत थी या चाह,
पर दोस्तिका सालिका नागवार था, ये सुनके हैरान रह गया मै.
खामोश लब ही बाते ज्यादा करते हैं,
कहते नही कुछ भी और बहुत कुछ कह जाते हैं.
कभी इस गुलीस्तामेभी बहारे थी, आज जहां सेहेरा है.
पतंगे तो यहां भी उडा करती थी, आज बंदोंका पहरा है.
रंगीन शामो की जगह, रात का अंधेरा है.
इतर बहा करता था जहा, उडता लहुका फव्वारा है.
सैलानियोकी भीड उमडती थी यहा, आज चील का चील्लाना है.
ये क्या बना दिया मेरे काबुल को ए खुदा,
जहा कभी सिक्कोकी झनझनाहट थी, आज भुको का कोहराम है.
इतिहास रचा जिस शहरने, उसका आज करता हैरान है.
पतंगे तो यहां भी उडा करती थी, आज बंदोंका पहरा है.
रंगीन शामो की जगह, रात का अंधेरा है.
इतर बहा करता था जहा, उडता लहुका फव्वारा है.
सैलानियोकी भीड उमडती थी यहा, आज चील का चील्लाना है.
ये क्या बना दिया मेरे काबुल को ए खुदा,
जहा कभी सिक्कोकी झनझनाहट थी, आज भुको का कोहराम है.
इतिहास रचा जिस शहरने, उसका आज करता हैरान है.
पत्थरकोभी पिघला सकता हुं मैं,
पर तेरे दिल को पिघला न सका,
बंद बोतलसेभी नशा कर सकता हुं मैं,
पर तेरी खामोषी को मै तोड ना सका।
तेरे ईन्कारमेंभी एक अदा थी,
जिसमें ईकरार की एक सदा थी,
कोई वजह होती, तो ढुंढ पाता मैं,
वरना बेवजह दि हुई वो सजा थी ।
थिरकते जाममें आशीयां देख लिया तुमने,
कभी अपने घरमें झांक लिये होते,
ये किस तरहकी जिंदगी बनाली तुमने,
एक बार तो अपने दिलसे पुछ लिये होते।
पर तेरे दिल को पिघला न सका,
बंद बोतलसेभी नशा कर सकता हुं मैं,
पर तेरी खामोषी को मै तोड ना सका।
तेरे ईन्कारमेंभी एक अदा थी,
जिसमें ईकरार की एक सदा थी,
कोई वजह होती, तो ढुंढ पाता मैं,
वरना बेवजह दि हुई वो सजा थी ।
थिरकते जाममें आशीयां देख लिया तुमने,
कभी अपने घरमें झांक लिये होते,
ये किस तरहकी जिंदगी बनाली तुमने,
एक बार तो अपने दिलसे पुछ लिये होते।
Monday, 12 January 2015
घट्ट मिटल्या ओठांना, शब्द तु देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
काय तुझी प्रतिमा मनात, काय मी सांगु तुला,
मित्रत्वाची सर्व भुषणे, केली मी अर्पण तुला,
या माझ्या भावनांना, तिलांजली देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
जाहल्या असतील चुका, पण राग तु मानु नको.
शब्द वेडे असतील, पण भाव तु शोधु नको,
छिन्न झालेल्या मनाला, डागण्या देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
काय बोलायचे, कसे ते आजवर जमलेच नाही,
प्रत्येकाचा वर्ग वेगळा, आजवर कळलेच नाही,
आधीच पोळल्या जीवाची, जखम तु फ़ुलवु नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
दोष तुला देत नाही, पण तु ही मला समजुन घे रे,
मैत्र मी समजुन, सारे शब्दास्त्र तुजवर रीते केले,
त्या स्वरांना विसरून जा तु, सुर त्वा देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
घट्ट मिटल्या ओठांना, शब्द तु देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
Subscribe to:
Posts (Atom)