Tuesday, 3 February 2015

तुला पटेल ते तु कर, आणि मला हवे ते मला करू देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.

माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुझी प्रतिमा जपली आहे मी,
नसेल तुझ्या मनात माझी प्रतिमा, तर नसु देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.

एकाच नाण्याच्या दोन बजु असलो,
तरी विचारांची फारकत असु शकते कि, आणि असु देत,
पण मैत्रीच्या या धाग्याची वीण मात्र, आहे तशीच राहु देत.

No comments:

Post a Comment