विश्वास कुठे पाहीला का हो?
हरवलाय कुठे कळत नाही,
स्वार्थाच्या या दुनियेत,
शोधुनही सापडत नाही.
मैत्रीत पुर्वी दिसायचा,
आता तिथेही तो भेटत नाही,
इथेही त्याच आता म्हणे,
पुर्वीसारख मन रमत नाही.
काहीतरी चुकलय म्हणतो,
आता कोण कोणाच राहिल नाही,
संशयाने घर जिथे घेतलं,
तिथे विश्वासाला थारा नाही.
आज त्याची गरज भासली,
म्हणुन शोधायला गेलो तर,
हरवलाय कुठे कळत नाही,
स्वार्थाच्या या दुनियेत,
शोधुनही तो सापडत नाही.
No comments:
Post a Comment