Tuesday, 3 February 2015

मी काही तुझ्यावर नाही रागावलो मित्रा,
मला माझीच शरम आली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.

मला वाटल मी शब्दांचा सोहळा करतोय,
मग कशी काय त्या शब्दांना धार आली, 
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.

सगळे म्हणतात म्हणजे असेनही मी वेडा,
पण ती वैचारिक दिवाळखोरी माझ्या नशिबी का आली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.

बौद्धिक शहाणपण हा कधीच माझा विषय नव्हता, 
पण सारासार विचारबुद्धी पण कशी ना चाले झाली, 
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.

मित्रांवर पण आपला हक्क नसतो हे आज कळलं मला,
मैत्र मानलं त्यांचीच खप्पा मर्जी झाली, नी 
मैत्रीच्या नात्याचीच ऐशीतैशी झाली,
विचार करतोय, साली अशी कशी माझी प्रतिमा झाली.

इतर कुणाला कशाला दोष देऊ, मीच माझ्या दोषांचा धनी, 
मैत्रीची पण एक आचारसंहिता असते, तीच माझ्या लक्षात नाही आली,
आणि आता वेळ गेल्यावर विचार करून काय उपयोग कि, 
साली अशी कशी प्रतिमा झाली.

No comments:

Post a Comment