एक माझा चांगला मित्र त्याची ही कहाणी :
माझा मित्र दीपक एकदा असाच घरी आला आणि म्हणाला ' यार बरेच दिवस झाले एक गोष्ट सांगायची होती. सांगितली तर उगाच मोठेपणा दाखवण्यासारखं होईल. पण तरीही आपली वागणुक आणि संस्कार कुठे ना कुठे आपल्या कामी तरी येतात किंवा नुकसान तरी करतात याच प्रत्यंतर आल म्हणुन सांगायचय.' मी म्हंटलं त्याला 'अरे बिनधास्त संग रे काय माहित तुझा अनुभव दुसऱ्या कुणाच्या तरी कामी येईल,' मग त्याने सांगायला सुरुवात केली.
दिल्लीला जेव्हा पोस्टिंग होत तेव्हा कंपनीने एह्मद नावाचा ड्रायवर दिला होता. त्यानंतर मुंबईला दुसऱ्या कंपनीत रूजु झालो तरी जेव्हा कधी दिल्लीला जायचो तेव्हा या एहमद्लाच बोलवायचो. असाच एकदा दिल्लीला पुन्हा गेलो असताना एह्मद्ला म्हंटलं यार जरा त्या आधीच्या कंपनीच्या ऑफिसमधे घेऊन चल, कोणी भेटतात का बघु जुने सहकारी मित्र. तिथे गेलो तर बराच स्टाफ बदलला होता. पण एडमीन मेनेजर तोच होता. बराच वेळ गप्पा मारल्या. जेवण झालं. मग त्याने सर्व स्टाफला मीटिंग हॉल मधे बोलावलं. आणि माझी ओळख करून दिली. त्याने सांगितलेल्या गोष्टीने तर मी अवाकच झालो आणि थोडा संकोचलो सुद्धा. ती गोष्ट अशी की "मी इथे काम करत असताना, माझ्या हाताखाली रमेश नावाचा एक इंजिनीअर चार महीन्यांपुर्वी कामाला लागला होता. जुन मधे आम्हाला पर्फोर्मंस बोनस मिळायचा. तसा मला तो २ लाख रुपये मिळाला. पण रमेश नुकताच लागला होता, त्यामुळे त्याला बोनस मिळणार नव्हता. पण माझ्या मनाला काही हे पटेना. कारण रमेश आपल्या कामात हुशार आणि वक्तशीर पण होता. पण निव्वळ नोकरीत पक्का झाला नही म्हणुन बोनस नही हे मला पातला नाहीं. मी एडमीन मेनेजरशी बोललो, पण त्याने असमर्थता दाखवली. मग मी त्याला असा पर्याय दिला की तु माझ्या बोनस मधला अर्धा बोनस रमेशला दे. पण हे कुणालाच कळता कामा नये. मग आम्ही दोघांनी थोडी चर्चा करून रमेशला मी माझ्या हिश्शाचा अर्धा बोनस देववला. रमेश फार खुश झाला आणि म्हणुन मी पण खुश झालो. पण ही गोष्ट मी पण विसरून गेलो. नंतर मी ती कंपनी सोडली, रमेश पण बाहेर गेला. पण आम्ही त्याला ती गोष्ट कधीच कळू दिली नाही. ती आज सर्व स्टाफ समोर त्या एडमीन मेनेजर ने सांगितली. सर्व स्टाफने टाळ्या वाजवुन माझे स्वागत केले. मला अत्यंत लाजल्यासारखे झाले. कारण मी काही याकरता ते केल नव्हत. पण तुमच उदाहरण सर्वाना प्रेरणादायक ठरेल म्हणुन सांगितला अस त्याने सांगितलं. मी त्याला म्हणालो अरे शेवटी काय घेऊन जाणार आहोत, आपण आपल काम करत राहावा. योग्य अयोग्य फळ मिळतच राहत. आपण जे देऊ शकतो ते द्यावं. कोणी दुसरा काही तरी करेल याची वाट पाहू नये. गेलेली वेळ परत येत नसते, आणि माणुस जमवता आला पाहिजे एवढं केल तरी जन्माला आल्याच सार्थक झालं अस मी मानतो. मग थोड्या वेळाने स्टाफ बरोबर चहा घेऊन तिथुन निघालो. आणि गाडीत तोच विचार करत होतो की आपले आई-वडील, शिक्षक, मित्र यांनी आपल्यावर जे संस्कार केले त्याचच हे फळ आहे. योग्य वेळी योग्यतो निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामुळेच जोपासु शकलो.
आणि हा अनुभव कोणाला तरी सांगावासा वाटला, म्हणुन तुला सांगितला. आता मनाला थोडं बारा वाटतंय.
अस हा माझा मित्र दीपक.
No comments:
Post a Comment