Tuesday, 21 October 2014

ती पावसाळी रात्र :

अशीच एक पावसाळी रात्र होती
ती कुठेतरी आसपासच होती

दिसत नव्हती पण जाणवत होती
प्रत्येक थेंबासरशी भिजवत होती

मी तर काय भीजायला तयारच होतो
तीच्या येण्याचीच काय ती वाट पहात होतो

ती आली, पण पाऊसच थांबला
तीला पाहुन तो  ही बरसायच विसरला

आसमंतात मस्त सुगंध पसरला
तिला पाहण्यासाठी चंद्रही विसावला
ती आली तशीच निघुन गेली

कस सांगु काय देऊन गेली
ती गेल्याबरोबर पावसाने आपला रंग दाखवला

वेड्यासारखा बरसायला लागला
बेलगाम वारुसारखा ऊध्अळायला लागला

ती पुन्हा येईपर्यंत हे असेच चालणार
तीची वाट पहात हा असाच बरसणार

2 comments: