Thursday, 23 October 2014


शिवसेना, मनसे = मराठी माणुस (?)

१ मे १९६० या दिवशी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. त्याआधी संपुर्ण भारत भाषावार प्रांतरचनेने विभागण्यात आला होता. फक्त आत्ता आपण ज्या गुजराथी भाईच्या नादी लागुन पंतप्रधान निवडला आहे, त्या गुजराथी लोकांमुळेच मुंबई गुजराथला जोडणार होते हे पण विसरून चालणार नाही. पण अत्रे, जोशी, बापट, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार यांनी विरोधाचा असा काही धुरळा उडवला कि मुंबई महाराष्ट्रातच राहिली. पण त्याकरता कित्येक लोकांना हुतात्मा व्हावं लागलं आणि त्यात एकही गुजराथी नव्हता. त्यावेळी मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई. आपण जन. डायरला जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल गुन्हेगार मानतो, मग यांचं काय? तो तर परका होता. पण हे सहीसलामत सुटले. त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री होते श्री. यशवंतराव चव्हाण. पण तेही मराठी असुनही विरोधकच.

एवढं होऊनही मराठी माणसाला न्याय मिळाला का? तर नाही. मुंबईत वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती चालू झाली आणि त्यात मुख्यत्वेकरून मद्रासी माणस भरण्याचा सपाटा चालु झाला. तेव्हा शिवसेनेला काम मिळालं. उठाव लुंगी बजाव पुंगी अशी अत्यंत अश्लील टीका करत बाळासाहेब ठाकरे मराठी बचाव समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष झाले. आज जे भैय्या लोकांचं झालं होता, तेच त्याकाळी मद्रासी लोकांचं झालं होत. एवढं करून मराठी माणसाचा त्याच्याच भुमीतील अस्तित्वाचा प्रश्न मिटला का? तर नाही. पण शिवसेनेला लोकप्रियता मिळाली, मराठी माणसांच्या हक्क्काची जपणूक करणारी सेना म्हणुन. पण हा आनंद काही कालच टिकला. कारण ज्या अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जीवाचा रान केल, त्याच अत्रेंना निवडणुकीत पाडण्यासाठी शिवसेनेने पण जीवाचं रान केल. ठाण्याच्या सभेत अत्रेंवर चप्पल भिरकावण्याएवढी मजल शिवसेनेने मारली. स्वताच्या स्वार्थापुढे व कॉंग्रेसच्या भल्यासाठीच शिवसेनेने तेव्हाही स्वतःला वापरू दिल. त्याबद्दल खंत ना खेद.

दुसरा धक्का मराठी माणसाला बसला जेव्हा कॉ. कृष्णा देसाई यांचा खुन झालं तेव्हा. हा इथला पहिला राजकीय बळी शिवसेनेच्या नावावरचा. तेव्हाही शिवसेनेवर प्रचंड टीका झाली कॉंग्रेसचा बगलबच्चा असल्याची. लाल बावटा युनिअन संपवण्यासाठी कॉंग्रेसने शिवसेनेला हाताशी धरल, आणि हा इतिहास आहे. त्यानंतर पण शिवसेनेने कॉंग्रेससाठी काम करत असल्याची बरीच उदाहरण आहेत. जस दत्ता सामंत यांची हत्या. विजु नाटेकर याची हत्या. हि सगळी मराठी माणसचं होती.

शब्द उधळण्यापेक्षा जास्ती काम काहीच केल नाही आहे शिवसेनेने मराठी माणसासाठी. तस नसत तर बेळगाव आज महाराष्ट्रात असता. फक्त शाब्दिक कोट्या करत मराठी माणसांच्या भावनेला हात घालुन मराठी अस्मितेचा मुद्दा संपुर्ण चुकीच्या पद्धतीने पुढे आणुन मराठी माणसाचं खच्चीकरण जर कोणी केल असेल तर ते नक्कीच शिवसेनेने. विचार करा आज कित्येक वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती आहे. पण तरीही मुंबईत महाराष्ट्र राहिलंय का ? किती खराब स्थिती आहे. रस्ते खराब, घाणीच साम्राज्य, पाण्याची वानवा. दळणवळणाची साधनं पुरेशी नाहीत. प्रश्न विचारलेकि  राज्य सरकारकडे बोट दाखवायचं. महानगरपालिकेच्या शाळांची हालत बघा. जे शक्य होता ते शिवसेनेने कधीच केल नाही. फक्त मराठी माणसाच्या नावाने राज्य केल व स्वताची राजकीय आकांक्षा पूर्ण केली. आणि हे सत्य बाहेर आल जेव्हा पार्लमेंट मध्ये पहिला आमदार म्हणुन सेनेने प्रीतीश नंदी यांची नीवड केली. कोणी लायक मराठी माणुस नव्हता?

आज आपण छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांना शिव्या घालतो, पण या सर्वाना हि ओळख दिली कोणी. हि सर्व याच पूर्णामाइची लेकर आहेत. शरद पवार यांचे राजकीय विरोधक पण सामान्य जीवनात घनिष्ठ मैत्र. हे कसले असले मैत्र. औरंगझेब  आणि शिवाजी मैत्र असल्याचे दाखले आहेत का इतर फावल्या वेळेत? हे असले मैत्र काय कामाचे. संजय दत्त सारख्या माणसाला ज्याचे मुंबई घातपात घटनेमध्ये हात होता अशा माणसाला सोडवण्यात यांनी धन्यता मानली. तेव्हा मराठी माणसाचा नाही विचार केला तो. जे जे हत्याकांडाच्या हत्यार्याना शरद पवार आपल्या विमानातुन घेऊन गेले, आणि तरीही यांची मैत्री. यात मराठी माणसाचा अपमान नाही का? मुंबईवर फक्त आम्हीच राज्य करणार, कसाही करणार, कोणी विरोध केला तर वैचारिक विरोध न करता हाणामारी करायची हेच काम गेली कित्येक वर्ष शिवसेना करत्ये. यात कुठे आहे मराठी माणसाची भलाई.

मराठी माणसाला वडापावच्या गाड्या टाकण्यासाठी उद्युक्त केल कोणी? का नाही चांगले व्यवसाय करण्यासाठी पाठबळ दिल. ज्या लोकांची वरती नावे घेतली आहेत हि सर्व मंडळी गब्बर आहेत. का त्यांनी मदत नाही केली मराठी तरुणांना. कारण त्यांना हे करायचच नव्हत. मराठी तरुणांना भाषिक मुद्द्यावर गुंतवून ठेवून स्वतःची व इतर व्यावसायिकांची भले ते परप्रांतीय वा परभाषिक असोत तुंबडी भरायचं काम फक्त सेनेने आजवर केले आहे.

कॉंग्रेसला कायम घराणेशाहीबद्दल दोष देणाऱ्या सेनेने पण तेच केल. पाठचा पुढचा विचार न करता फक्त स्वताच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना पक्ष प्रमुख केल, लोकांच्या नाराजीच विचार न करता. परिणाम संमोर आहेतच. सर्वच ठिकाणी शिवसेनेची पीछेहाट.

त्यामुळे किंवा त्यासाठीच राज ठाकरे पक्षातुन बाहेर पडले अस म्हणतात. पण मला तर वाटत कि भागीदारी वाटुन खाण्यासाठी केलेली हि राजकीय तडजोड आहे. कारण इतक्या वर्षात त्यांच्या पक्षानेही भैय्या हटाव या मोहिमेवयतिरिक्त   काहीच भरीव (?) कामगिरी केली नाही आहे. फक्त बोलाचा भात आणि बोलाची कधी एवढीच त्यांची अजुन ओळख आहे. जी काही आंदोलन चालु करायची ती अचानक बंद करायची, का चालु करायची, का बंद करायची, फलित काय, हे असले अडाणी प्रश्न यांना पडत नसावेत आणि कोणी विचारलेले यांना चालत नाहीत. कि पोचलीच यांची सेना त्यांच्या दारी. दहा वर्ष झाली यांना पक्ष सुरु करून. पण सुपारीबाज आंदोलक हि ओळख आहे या पक्षाची. मग का म्हणुन यांना मराठी माणसांनी मत द्यायची? काय केलय यांनी मराठी माणसांसाठी.

असा सगळा वैचारिक गोंधळ माजवलाय या दोन पक्षांनी. मराठी माणसाच्या भाषिक अस्मितेला हात घालुन स्वतःची राजकीय गणित सोडावयाची कामगिरी मात्र यांनी उत्तमपणे केली आहे. मत चांगल्या माणसाला द्या. भाषेला, धर्माला नको. आपण मित्राला विचारतो का असले प्रश्न. तसच आहे हे पण. चांगला माणुस मग तो कुठल्याही पक्षाचा, धर्माचा, भाषेचा असो त्याला मत द्या. लिहायचं म्हंटलं तर बरच काही लिहिता येईल, पण जे मला दिसले ते मुद्दे इथे मांडले, त्याचा प्रतिवाद होऊ शकतो. आणि त्यातही आजच्या जागतिक अर्थकारणाच्या काळात भाषिक आणि वांशिक मुद्दे गौण ठरतात. भारतीय बना. महाराष्ट्रीय, मराठी तर आहोतच.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

1 comment:

  1. Atishay abhayspurna lekha...mala aavadla aani patala suddha !

    ReplyDelete