Thursday, 22 January 2015

फैसला तो तुमने ले लिया,
अब इल्जाम भी लगा दे कोई.

Wednesday, 21 January 2015

भारत स्वच्छता अभियान :

आज सकाळी ऑफिस इमारतीजवळ एक रेली पाहिली. हिंदुस्तान पेट्रोलिअम कंपनीचे कर्मचारी भारत स्वच्छ अभियानाच्या घोषणा देत होते. हातात घोषणा फलक होते आणि सर्वांच्या डोक्यावर एकाच रंगाच्या (पिवळ्या) टोप्या होत्या. काही जणांच्या हातात झाडु होते आणि ते लोक उभ्या उभ्या जराही कमरेत न वाकता रस्त्यावरचा (कफ परेडच्या ) नसलेला कचरा साफ करायचा देखावा करत होते. आणि त्यांच्या पुढे एक छायाचित्रकार हे सर्व नाटक चित्रबद्ध करत होता. आता तुम्हीच सांगा मित्रहो, अशा ठिकाणी कचरा सफाईची अभियान राबवुन यांना काय उद्देश साधायचा आहे. करायचंच असेल तर नालेसफाई करा कि. दरवर्षी पावसाळ्यात याच नाल्यांमुळे रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे प्रकार घडतात. पण त्याकडे पुर्ण दुर्लक्ष करून आजकाल लोक भारत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत समाजातील विशिष्ट घटकांना खुश करायचीच योजना राबवत आहेत की काय अशी शंका येते. बर यांची ही जी काही तथाकथित रेली होती, ती पण कामाच्या वेळेत, म्हणजे स्वतःच्या पदरचा वेळही खर्च न करता यांना ही अशी कृती कशी करू दिली जाते, याचा अभ्यास व्हायला हवा. सरकारी पातळीवर अशा योजना म्हणजे काम न करता करमणुक करण्याचा मुक्त परवानाच जणु.

मुळात स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम देशात राबवण्याची पाळी येणे हीच मुळात लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा एक जनसामान्य म्हणुन आपण कधी विचार करणार? मला रस्त्यात कचरा करायचा नाही किंवा मला रस्त्यात थुंकायचं नाही हे सांगायची किंवा त्यासाठी दंड करायची वेळ सरकारवर का यावी? याचा आपण विचार कधी करणार आहोत. कुठल्याही देशाच्या   सरकारपुढे अनेक आव्हान, उद्दिष्टे असतात. स्वच्छता अभियानासारखं उद्दिष्ट कुठल्याही सरकारच असुच शकत नही. ही जबाबदारी त्या देशातल्या सुजाण नागरिकांची असते. पहिले स्वतःला, मग घराला, मग परिसराला स्वच्छ ठेवणे हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाच असल पाहिजे. ते जर असेल तरच आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत असे आपण म्हणु शकतो. 

आजकाल बरीच मंडळी विविध कारणांनी परदेशगमन करून येतात व परदेशातल्या स्वच्छतेच आणि तिथल्या नागरिकांच्या साफसुथरे राहण्याचं तोंड फुटेस्तोवर कौतुक करतात आणि आपल्या देशातील घाणीच्या साम्राज्याला नावे ठेवतात. ही मंडळी हे नेमकेपणाने विसरतात की या साम्राज्यवाढीला आपलाही हातभार लागलेला आहे. परदेशात असताना तिथले नियम पाळणारी ही शहाजोग मंडळी आपल्या देशात आली की सगळे  नियम बासनात गुंडाळुन कचरा करायला तयार असतात. फक्त इंग्रज माणसाचं कौतुक करून आणि त्याची भाषा शिकुन आपण सुजाण बनलो का? याचा विचार व्हायला हवा. त्याची नियम पाळण्याची सवय आपण आपल्या अंगी जडवुन घ्यायला हवी. मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़ल उचलणार नाहीं हे बाणेदार उत्तर झालं, पण देश तेव्हाच स्वच्छ होईल जेव्हा आपण गांधी विचार अंगी बाणवुन दुसर्याची टरफ़ल पण उचलायला सिद्ध होऊ, आणि तेव्हा आणि तरच आपल्या सरकारला हे असले फुटकळ अभियान राबविण्याची गरज भासणार नाहीं, अस मला वाटतं. 
एक शाम ढलती हुई :

कभी देखा है तुमने शाम ढलते हुए,
आसमाको अपना रंग बदलते हुए,
पंछीओंको घर लौटते हुए,
एक उदासी भरा माहौल होता है.
मैने भी देखा है उसे,
मेरे दिल में अंधेरा करके,
अपने घर लौटते हुए,
रुकते हुए पैरोको खिंचते हुए,
दुर दुर तक मुझपे निगाहे जमाके,
मेरी तकदीर को मुझसे दुर ले जाते हुए,
उसके चेहरेका नुर भी,
आसमाके रंग की तरह बदल रहा था,
आखोसें  बरसते अश्कोंसे,
उसका गुलाबी चेहेरा गिला हो रहा था.
कहना था बहुत कुछ,
मगर जुबापे आनेसे कतरा रहा था.
मैं तो अमावस के चांद की तरह,
अपने आप को महसुस कर रहा था.
आसमामे होते हुए भी,
ना दिखनेकी कोशिश कर रहा था.
ये जानते हुए वो शाम अब फिर ना आयेगी,
एक जो आसमामे ढल रही थी,
एक मेरे दिलमे अंधेरा कर रही थी,
हमेशा के लिये.

Tuesday, 20 January 2015

जो जी मे आए कहले मुझे,
मेरी नियत पे ना शक करना कभी,
मै युही मर जाऊंगा तु कहे तो, 
मेरे प्यार का इम्तहान ना लेना कभी


एक अनकही सच्चाई है मौत,
फिर क्यो मरनेसे डरते है लोग,
जिंदगी तो बस एक पहेली है,
फिर भी जिने के लिये क्यो मरते है लोग.



रेत की दिवार से घर नही बनते,
टूटी हुई नाव से किनारे नही मिलते,
दोस्त बिगडा है तो क्या हुआ, उसे मनाओ,
कहदो साले, तेरे बगैर मेरे दिन नही कटते. 


सुना था दोस्तीकी ना जमी होती है ना आसमां,
पर तुमसे मिलके, उसकी हदोको जान गया मै,
सवाल ये था की, क्या मेरी आह गलत थी या चाह,
पर दोस्तिका सालिका नागवार था, ये सुनके हैरान रह गया मै.


खामोश लब ही बाते ज्यादा करते हैं,
कहते नही कुछ भी और बहुत कुछ कह जाते हैं.
कभी इस गुलीस्तामेभी बहारे थी, आज जहां सेहेरा  है.
पतंगे तो यहां भी उडा करती थी, आज बंदोंका पहरा है.
रंगीन शामो की जगह, रात का अंधेरा है.
इतर बहा करता था जहा, उडता लहुका फव्वारा है.
सैलानियोकी भीड उमडती थी यहा, आज चील का चील्लाना है.
ये क्या बना दिया मेरे काबुल को ए खुदा,
जहा कभी सिक्कोकी झनझनाहट थी, आज भुको का कोहराम है.
इतिहास रचा जिस शहरने, उसका आज करता हैरान है.
पत्थरकोभी पिघला सकता हुं मैं,
पर तेरे दिल को पिघला न सका,
बंद बोतलसेभी नशा कर सकता हुं मैं,
पर तेरी खामोषी को मै तोड ना सका।



तेरे ईन्कारमेंभी एक अदा थी,
जिसमें ईकरार की एक सदा थी,
कोई वजह होती, तो ढुंढ पाता मैं,
वरना बेवजह दि हुई वो सजा थी ।



थिरकते जाममें आशीयां देख लिया तुमने,
कभी अपने घरमें झांक लिये होते,
ये किस तरहकी जिंदगी बनाली तुमने,
एक बार तो अपने दिलसे पुछ लिये होते।

Monday, 12 January 2015



घट्ट मिटल्या ओठांना, शब्द तु देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.

काय तुझी प्रतिमा मनात, काय मी सांगु तुला,
मित्रत्वाची सर्व भुषणे, केली मी अर्पण तुला,
या माझ्या भावनांना, तिलांजली देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.

जाहल्या असतील चुका, पण राग तु मानु नको.
शब्द वेडे असतील, पण भाव तु शोधु नको,
छिन्न झालेल्या मनाला, डागण्या देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.

काय बोलायचे, कसे ते आजवर जमलेच नाही,
प्रत्येकाचा वर्ग वेगळा, आजवर कळलेच नाही,
आधीच पोळल्या जीवाची, जखम तु फ़ुलवु नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.

दोष तुला देत नाही, पण तु ही मला समजुन घे रे,
मैत्र मी समजुन, सारे शब्दास्त्र तुजवर रीते केले,
त्या स्वरांना विसरून जा तु, सुर त्वा देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.

घट्ट मिटल्या ओठांना, शब्द तु देऊ नको,
थांब बोलु दे मला, तु काही बोलु नको.
सुना था दोस्तीकी ना जमी होती है ना आसमां,
पर तुमसे मिलके, उसकी हदोको जान गया मै,
सवाल ये था की, क्या मेरी आह गलत थी या चाह,
पर दोस्तिका सलिका नागवार था, ये सुनके हैरान रह गया मै.



खामोश लब ही बाते ज्यादा करते हैं,
कहते नही कुछ भी और बहुत कुछ कह जाते हैं.