महाराष्ट्र : पुरोगामित्वाची झूल पांघरणारा प्रतिगामी प्रदेश
स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या जयंतीदिनी शनि शिंगणापूर येथे एक क्रांतिकारी घटना घडावी हा योगायोगच म्हणावा. महिलांना मज्जाव असणाऱ्या चौथऱ्यावर चढून एका स्त्रीने आपल्या महान रूढी परंपरांचा खून करत स्त्रियांना प्रवेश नसलेल्या भागात जाउन शनि देवाचे दर्शन घेतले म्हणजे फारच झाले. वर्षानुवर्ष फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी स्त्री प्रवेश करते हि घटना हा "पुरोगामी" महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हे शनि देवाचे दुधाने अभिषेक करून आपण दाखवून दिले. समाज निरक्षर राहिला तरी चालेल पण पूर्ण अंधश्रद्ध राहायला पाहिजे याची हा "पुरोगामी" महाराष्ट्र पूर्ण काळजी घेत आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या महान परंपरा आहेत आणि त्यांना छेद देण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि जे तसा प्रयत्न करतील त्यांना या जगातून रीतसर नाहीसे करण्यात येईल हा संदेश आपण अंधश्रद्ध निर्मुलन समितीचे प्रमुख श्री नरेंद्र दाभोळकर व सामाजिक कार्यकर्ते कॉ गोविंद पानसरे यांची हत्या घडवून आणून दिलाच आहे. हो आपणच त्यांची हत्या केली आहे, कारण एवढ होऊनही जर का आपण एक समाज म्हणुन या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध उभे राहणार नसू व जे होतंय ते मूकपणे बघणार असू तर मी म्हणेन कि त्यांच्या हत्येला आपणच सर्व जबाबदार आहोत. चुकीचे कायदे लादले म्हणून इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करणारे हेच भारतीय लोक, सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजा राम मोहन रॉय ना साथ देणारी हीच भारतीय मानसिकता, आज अचानक लोप पावली आहे. आज जो तो फक्त आपल्यापुरते पाहतो आहे. जे घडतंय त्याचा त्रास मला व माझ्या कुटुंबियांना होता कामा नये एवढी संकुचित जबाबदारी आपण बाळगतो आहोत.
एक समाज म्हणून आपण खूप दांभिक आहोत. एका बाजूला आपण शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कशी स्वताच्या आईची उपमा दिली यावर भरघोस चर्चा करतो, स्त्रीला देवीची उपमा देऊन, तिला आदिशक्तीचे रूप मानून तिची पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच स्त्रीला अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या आहारी जाऊन आपण कस्पटासमान वागणूक देतो. जी स्त्री हि जननी आहे, माता आहे, या सृष्टीच्या असण्यामध्ये जिचा बरोबरीचा किंवा जर जास्तच वाटा आहे तिला आपण सृष्टीकर्त्याच्या (?) दर्शनापासून वंचित ठेवतो. आणि याला आपण परंपरेचा बाळसेदार मुखवटा चढवतो. निसर्गनियमांमुळे स्त्रियांना ज्या गोष्टीला सामोरं जाव लागत त्यात तिचा काय दोष? आणि हा झगडा जर का देवाचा आणि स्त्रीचा असेल तर देवालाच निर्णय घेऊ देत कि. आपण का त्यात ढवळाढवळ करतोय. कि देव काही करू शकणार नाही व काही करत नाही यावर आपलाही ठाम विश्वास आहे कि काय? म्हणून आपण स्वतःच या सृष्टीचे नियम ठरवतो आणि ते सर्व समाजाला बंधनकारक करतो कि काय नकळे
याच समाजाच्या अशाच विचारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करावासा वाटला, आणि एक खूप मोठा समुदाय हिंदू धर्मापासून वेगळा झाला कायमकरता. आणि असाच विचार आजच्या सर्व महिलांच्या मनात आला तर ? काय गहजब उडेल विचार करा फक्त. कारण विचारांना कृतीची जोड द्यायलाच हवी अशी काही या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची परंपरा नाही. पण एक नवीच परंपरा इथे जन्म घेताना दिसत आहे आजकाल. ज्यांचे विचार पटणार नाहीत किंवा ज्यांच्या विचारांनी समाज जागृत होणार असेल अश्या सामाजिक भान असलेल्या विभूतीना या जगातून तत्परतेने नाहीसे करायचे, हि ती परंपरा. आणि हे कृत्य करणाऱ्या महान क्रांतीकारकांना हे पूर्ण ज्ञात आहे कि हा महाराष्ट्र आता कधीही पेटून न उठणाऱ्या विझलेल्या ज्वालामुखीसारखा आहे. तुम्ही कितीही घाव घाला येथे परत काही असंतोषाचे जनक निर्माण होणार नाहीत, कि सुधारक जन्म घेणार नाहीत. सेनापती बापट आज हयात असते तर म्हणाले असते कि भारत एक देश म्हणून भले प्रगती करत असेल पण यात महाराष्ट्र कुठे दिसत नाही. (दिसत नाही म्हणजे नैतिकता कुठे दिसत नाही). पुढे जाऊन अस म्हणावसं वाटत कि आज जर ज्योतिबा असते तर या महाभागांनी त्यांचाही खून केला असता आणि आपण तेव्हाही असेच बघत बसलो असतो जसे आज बघत बसलो आहोत.